What is a state?
आपण सर्वजण राज्याचे सदस्य आहोत व राज्याच्या सीमेअंतर्गत राहातो. राज्य हे केवळ संस्थांचा समुह नसून तर आपण कळत नकळत पालन करीत असलेल्या व्यवहार, परंपरा आणि दृष्टीकोनांचे संकलीत स्वरुप आहे. राज्यात नागरिकांच्या व्यवहारांचे काही नियमन असते. त्यात राज्याच्या आज्ञांचे पालन करणे निवडणूकीत मतदान अनिवार्य असणे, सक्तीचे लष्करी शिक्षण इ. गोष्टींचा समावेश असु शकतो. अनेक विचारवंताच्या मतानुसार राज्य हे आधूनिक राजकीय सिध्दांतामध्ये सर्वाधिक महत्वाचे आहे. कारण आपल्या अध्ययन करीत असलेल्या अधिकार, लोकशाही, समता, स्वातंत्र्य हे सर्व राजकीय सिध्दांत राज्य व नागरिक यांच्यातील संबंधांवर आधारलेले आहेत. राज्याविषयी कोणत्याही चर्चेत राज्याचे कार्य हा महत्वाचा विषय आहे. अनेकदा राज्य आणि शासन हे या संज्ञा समान अर्थाने वापरल्या जातात. पण प्रत्यक्षात त्या वेगवेगळ्या आहेत. मॅक्स वेबरच्या मते एका विशिष्ट प्रादेशिक क्षेत्राात अधिमान्य दंडशक्तिवर असलेला एकाधिकार हे आधुनिक राज्याचे महत्वाचे लक्षण आहे. त्याने तीन पैलु सांगितले प्रादेशिकता, दंडशक्तिवर एकाधिकार आणि अधिमान्यता. अधिमान्यता समजुन घेतांना आपणास अधिमान्यता म्हणजे काय ॽ हे पुढील प्रमाणे समजुन घेता येईल. त्याला इंग्रजी भाषेत Legitimacy असा प्रतिशब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील Legitimare या क्रियापदापासून झाली आहे. त्याचा अर्थ योग्यता (Righfulness) असा होतो. अधिमान्यता ही आदेशाला अधिसत्तात्मक रुप देते. म्हणजे सत्तेचे रुपांतर अधिसत्तेमध्ये करते. आज्ञापालन करवून घेणे आणि आज्ञाभंग करण्याऱ्यांना शिक्षा करणे हा राज्याचा अधिकार आहे. एखाद्या चोराजवळ आपल्यला इजा करण्याची शक्ति असु शकते. पण त्याची शक्ति कायदा व नैतिकता या दोन्ही दृष्टीने योग्य नाही. आपण सर्वांनी राज्याला शासन करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच राजकीय दायित्वाच्या भावनेतून आपण राज्याच्या आज्ञांचे पालन करतो. दायित्व (Obligation ) म्हणजे “विशिष्ट पध्दतीने कृती करण्याचे कर्तव्य” आहे. राज्यात कायद्याचे पालन करणे हेच राजकीय दायित्व पूर्ण करणे होय. आपण राज्याच्या सर्व कायद्यांना आपल्यासाठी बंधनकारी मानतो. राज्य आपल्याला सुखी ठेवते म्हणून आपण त्यांचे आज्ञांचे पालन करतो. राज्याच्या निर्मितीसाठी सर्वात महत्वाचे तीन घटक तेही अनिवार्य ते पुढील प्रमाणे १. स्थायी लोकसंख्या २. निश्चित भुप्रदेश ३. प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच इतर राज्यांशी संबंध राखण्यासाठी शासनसंस्था राज्याला इतर राज्याकडुन मान्यता प्राप्त होणे महत्वाचे मानले जात असे, कारण राज्याचा आंतरराष्ट्रीय समुदायासत समावेश होत असे.
!! अरुणभारती !!
Leave a Reply