मागील Blog मध्ये आपण Administration म्हणजे काय हे समजावून घेतले. पुढे लोकप्रशासन (Public Administration) म्हणजे काय हे समजावून घेऊया लोकप्रशासन म्हणजे लोकांचे असलेले प्रशासन होय असा ढोबळ मानाने समजू. लोकप्रशासनातील “लोक” (Public) हा शब्द “राज्यातील सर्व लोक” या आर्थी वापरलेला आहे. Public याचा अर्थ “सार्वजनिक” असाही होतो. राजयातील जनतेचे हितसाधन्यासाठी सरकाररकडून विविध प्रकाराची कार्ये पारपाडली जातात. ती कार्ये पार पाडण्यासाठी विविध प्राकरच्या संघटना निर्माण केलेल्या असतात. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विविध प्राकरच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारलेली असते. लोकप्रशासनाला “सार्वजनिक प्रशासन” किंवा “सरकारी प्रशासन” असेही म्हटले जाते. विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ या शासनसंस्थेच्या तिन्ही विभागांच्या कार्याचा समावेश लोगप्रशासनात केला जातो. लोककल्याणासाठी हे तिन्ही विभाग कार्य करीत असतात. राज्याची ध्येयधोरणे ठरविणे , त्यासाठी लागणारे कायदे , नियम तयार करणे, त्यांची उंमलबजावणी करणे, त्यायनिवाडा करणे अशी कार्ये राज्य शासनाकडून चालतात. अशा प्रकारे लोकप्रशासनात शासनाच्या तिन्ही वभागांचा समावेश करावा की नाही ह वाद असला तरी असे म्हणता येईल की, लोकप्रशासनात तिन्ही विभागांच्या कार्याचा समावेश केला जातो.

लोकप्रशासनाची व्याख्या
Definition of Public Administration
प्रो. एल. डी. व्हाईट :- “लोकप्रशासनात अशा सर्व कृतींचा आणि कार्याचा समावेश केला जातो की ज्यांच्या उद्देश सार्वजनिक धोरणांची पूर्तता किंवा अंमलबजावणी करणे हा असतो.
ल्युथर ग्युलिक :- “ लोगप्रशासनाच्या संबंध शासनसंस्थेच्या कार्यकारी विभागाशी येत असतो कारण कार्यकारी विभागाव्दारे शासनाचे संपूर्ण कार्य चालते. म्हणूनच लोकप्रशासनात प्रामुख्याने कार्यकारी विभागाचा विचार केला जातेा.
वाल्डो :- “लोकप्रशासन ही एक अशी कला आणि व्यवस्थापनाचे शास्त्र आहे, की ज्याव्दारे राज्याची कार्ये पार पाडली जातात.”
प्रो. वुड्रो विल्सन :- “कायद्याची तपशिलवार आणि पध्दतशीरपणे कार्यवाही करणे म्हणजे लोकप्रशासन होय. कायद्याच्या कार्यवाहीसाठी केलेली प्रत्येक क्रिया ही प्रशासकीय क्रिया मानली जाते.
सामाजिक शास्त्रांच्या ज्ञानकोशानुसार :- “आर्थिक , सामाजिक, राजकीय अशा आपल्या संमिश्र स्वरुपाच्या समस्यांसह आधूनिक जगाचे प्रवेश केला आणि ते आपल्या समस्यांना तोंड देत असताना राज्यसंस्था त्यांच्या सोडवणूकीसाठी बहुतांशी त्यांच्या प्रशासनाकडे वळली”.
लोकप्रशासन शास्त्राच्या विविध व्याख्यांचा आश विचारात घेतला असता असे दिसून येते की, लोकप्रशासनाच्या व्याख्या व्यापक आणि मर्यादित अशा दोन दृष्टिकोणातून केलेल्या आहेत. व्यापक अर्थाने लोकप्रशासनाकडे पाहिले तर सार्वजनिक हितांच्या दृष्टीने शासनाला करावी लागणारी सर्व प्रकारची कार्ये विचारात घ्यावी लागतात. राजकीय, आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय अशा स्वरुपाची जी विविध कार्ये राज्य शासनाला करावी लागतात, त्या सर्व कार्यांचा समावेश लोकप्रशासनात केला जातो.
!! अरुणभारती !!
Leave a Reply