Process of Globalization
विसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि अर्थकारणात परिवर्तनाची चळवळ सुरु झाली. ही परिवर्तनाची मागणी पुढे येण्याचे कारण म्हणजे मागील काही वर्षापासून शीतयुध्द समाप्त होणे. सोव्हिएत संघराज्याचे विघटन, पूर्व युरोपात साम्यवादाचे पतन आणि अमेरिकेची एक ध्रुवी अर्थव्यवस्था अशा विविध कारणामुळे नवीन आंतरराष्ट्रीय अर्थ व्यवस्थेबरोबरच नवीन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचाही उद्य झाला. जागतिकीकरण : जागतिकीकरणाची चळवळ एक शतकापूर्वीच प्रांरभ झाली आणि तो काळ म्हणजे १८७० ते १९१४ चा कालखंड होय. एकोणिसाव्या शतकात जी जागतिकीकरणाची स्थिती होती तशीच आजच्या विसाव्या व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी निर्माण झाली आहे. एकोणिसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय गुंतवणू आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची जी स्थिती होती तशीच आज निर्माण झाली आहे. त्या काळात वाफेची जहाजे, रेल्वे आणि परिवहन व संचार साधने यामुळे आर्थिक परिवर्तन घडून आले होते. ज्या प्रमाणे आज अमेरिकेचे सर्व जगाावर आर्थिक प्राबल्य आहे तसेच त्या काळात ब्रिटनचे जगावर आर्थिक आणि राजकीय वर्चस्व होते. आजच्या डॉलर्स प्रमाणे त्या काळात पैंड-स्टरलिंग आंतरराष्ट्रीय मुद्रेची भूमिका पार पाडीत होता.

द्वितीय महायुध्दानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, ब्रेटनवृड्स पध्दतीने संचालित होऊ लागला. १९४४ मध्ये नवीन आंतरराष्ट्रीय मुद्रेची निर्मिती न्युहॅम्पशायर मधील ब्रेटनवृड्स येथे झाली. विशिष्ट राज्यांचे प्रतिनिधी एकत्र आले. जुनी अर्थव्यवस्थ कुचकामी ठरल्यामुळे नव्या आंतरराष्ट्रीय मुद्राव्यवस्थेची निर्मिती त्यांनी केली. युध्दोत्तर काळात अमेरिका हे एकमेव आर्थिक व राजकीय द्ष्ट्या प्रबळ राज्य असल्यामुळे एकध्रुवीय सत्ताधारी राज्य म्हणून ते पुढे आले. अमेरिकेने नवीन आंतरराष्ट्रीय मुद्रा व्यवस्था प्रस्तापिक करण्यात पुढाकार घेतला व त्यातून जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली.
!! अरुणभारती !!
Leave a Reply