Western Modern Political Thinker “ Machiavelli”
इ. स. १४६९ ते इ. स. १५२७
पाश्चात्य राजकीय विचारांच्या इतिहासाचे जे कालखंड पडतात, त्यातील आधुनिक राजकीय विचारांचा कालखंड हा इ. स. १४५३ पासुन सुरू होतो. इ. स. १४५३ मध्ये सुप्रसिध्द “वेस्ट फालियाचा” तह झाला. ते तह प्रामुख्याने युरोपातील राष्ट्रांमध्ये होऊन त्यानुसार धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची फारकत होऊन नवे पर्व सुरू झोले त्या पर्वास “ प्रबोधनाचे पर्व” असे संबोधले गेले. म्हणुन १४५३ या वर्षाला विशेष महत्व प्राप्त झाले. प्रबोधनाची चळवह ही मध्ययुग आणि आधुनिक युग या दम्यांच्या काळाला संक्रमन काळ म्हणुन ओळखला जातो. प्रबोधनाच्या चळवळीचा उगम मध्ययुगातील इटलीसारख्या अतिशय महत्वाच्या देशात झाला. आश्चर्य म्हणजे सर्व क्षेत्रांतील पहिले प्रबोधनकार हे इटलीत जन्मले इटलीतच त्यांनी आपल्या जवळील असलेल्या नव -विचारांना आणि नव्या कृतींना चालना दिली. या सर्व प्रबोधनकारांपैकी एखादा लिओनार्ड-द-विंची Leonardo da Vinci असेल की, त्याने प्रथमच एका निरागस मातेचे स्मित दाखवणारे “मोनालिसा” हे प्रसिध्द चित्र काढले. प्रबोधन म्हणजे प्राचीन अभिजात कला आणि साहित्यामध्ये झालेले अभुतपूर्व परिवर्तन. ते प्रथम इटलीसारख्या देशात सुरू झाले आणि त्याचे लोण युरोपभर पसरून युरोपचा कायापालट झाला आणि त्याव्दारे संपूर्ण युरोपखंडात आधूनिक युगात प्रवेश केला. राजकीय विचारांच्या दृष्टीने इटालियन राजकीय विचारवंत मॅकियाव्हिली हा पहिला पाश्यात्य आधूनिक राजकीय विचारवंत म्हणता येईल.
निकोलो मॅकियव्हिलीचा जन्म इ. स. १४६९ मध्ये इटलीत झाला. जन्माच्यावेळी इटलीतील सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात हालाखीची होती. ऐके काळच्या रोमन साम्राच्याचे “ इटली ” हे केंद्र बिंन्दू होते. परंतू, मध्ययुगाच्या असखेर पवित्र रोमन साम्राज्याचा ऱ्हास होताना इटलीची स्थिती हालाखीची बनली निरनिराळ्या राजवंशाच्या २८ शाखा इटलीच्या १३ तुकड्यांवर राज्या करीत होते. त्यांच्यात सांस्कृतिक एकजीनसी असले तरी राजकीयदृष्ट्या त्या इटालियन साम्राज्याच्या विभाजन विघटन आणि विक्रेंद्रीकरण यांचे भक्ष्य बनल्या होत्या. मॅकियव्हिलीचा जन्म ज्या छोट्या राज्यात झाला. त्याचा राज्या “ प्रिस लिबी ” Prince livy हा होता. मॅकियाव्हेलीचे या राज घराण्याशी चांगले संबंध होते. मॅकियाव्हेलीला असे वाटत होते की, प्रिन्स लिवीन पुढाकार घुऊन साम-दाम-दंड-भेद आदी मार्गांचा अवलंब करुन इटलीचे एकत्रिकरण घडवून आणावेत. तो ए राजनीतीतज्ज्ञ आणि इतिहासकार होता. प्राचीन काळापासुन असलेले इटलीचे वैभव त्याला माहीत होते. इटलीचे एकीकरण झाल्याशिवाय इटलीचे गतवैभव पुन्हा निर्माण करता येणार नाही.

मॅकियाव्हेलीची ग्रंथ संपदा
- The Prince
- The Discourse
- History of Florence
- Art of War
मॅकियव्हिली ध्येय साध्य करण्यासाठी राज्यकर्ता व्यक्तीने कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी त्याचे समर्थन करतो, कारण साधनांपेक्षा साध्य श्रेष्ट असते असे त्योच प्रतिपादन करतांना दिसतो . मॅकियव्हिली हा स्वभावता:च एक व्यावहारिक प्रागतिक विचारवंत होता. राजकीय विचारांच्या इतिहासात एक वास्तववादी आणि व्यवाहरिक तत्वचिंतक म्हणुन मॅकियव्हिली ओळखला जातो. मॅकियव्हिली चा राजकीय अस्त हा सोडेरिनच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस जोडला जातो. दुसरा “ पोप ज्युलियन ” आणि “ बारावा लुई” या दोन शक्ती फ्रान्समध्ये सक्रिय होत्या. त्यांच्या भांडणात इटलीतील फ्लॉरेन्सने तटस्थ राहण्याचे धोरण स्वीकारले. परंतू त्यामुळे प्रत्यक्ष फ्लॉरेन्समध्ये दुफळी माजली. या काळात मॅकियव्हिली ने इटली आणि फ्रान्स या राज्यातील संबंध सलोक्ष्याचे कसे राहतील, हे पाहण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दुर्देवाने १५१२ मध्ये फ्लॉरेन्सच्या नागरिकांची सेना आणि सेनेचा सल्लागार असलेल्या मॉकियव्हिली यांना माघार घ्यावी लागली. अखेरीस फ्रान्सचा पोप ज्युलियनने आपल्या सैन्यानिशी फ्लॉरेन्सवर हल्ला केला आणि अठ्ठावीस परगण्यांपैकी एक परगण्याच्या मेडिसी राज्याला राज्यावर बसवण्यात आले. इ. स. १५१५ ते इ. स. १५२० या सहा वर्षांच्या कालखंडात मॅकियव्हिलीने आपले महत्वाचे ग्रंथ लिहिले. पुढे १५२५ पर्यंत त्याने आणखी काही लिखान केले. त्यांच्या सुर्देवाने वैचारिक लेखन करण्याची प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरा इटलीमध्ये पुनरूज्जीवित झाली होती. मॅकियव्हिलीने “द प्रिन्स” The Prince हा ग्रंथ मेडिसी यांना अर्पण केला. “Discourse” हा त्याचा दुसरा ग्रंथ, त्यातील संवाद आणि संभाषण त्याने मेडिसीबरोबरच केल्याचे दिसते. त्याचा आर्ट ऑफ वॉर Art of War हा ग्रंथ म्हणजे मेडिसीसत्तेचे सैन्य कसे उभारावे याचा परिपाकच म्हणता येईल. हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स History of Florence या ग्रंथाबाबत तर असे म्हणावे लागेल की, फ्लॉरेन्सचे राज्य पूर्ववत वैभवशाली व्हावे असे स्वप्न मॅकियव्हिलीने याच ग्रंथात पाहिले होते.
मॅकियव्हिलीला “प्रबोधन काळातील परिस्थितीचे अपल्य” असे जे म्हटले जाते, ते त्योन घेतलेल्या प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या काळापासुनच्या राजकीय विचारांच्या आढाव्यामुळे. त्याने असे दाखवून दिले आहे की, सत्ता, संपत्ती आणि लौकिक ही कोणत्याही राज्यावी अथवा राज्याची प्रमुख ध्येये मानली गेली आहेत. राज्याची नैतिक बाजु ही न्याय, सुखी भौतिक जीवन, स्वांतत्र्य आणि परमेश्वरप्राप्ती या उच्चतम मुल्यांसाठी वापरली जावी राज्यकारभाराबाबत मॅकियव्हिलीचा एक सल्ला आहे . तो म्हणतो की, राज्या किंवा राजपुत्राने दुसऱ्यांचे अनुकरण करावे. परंतु, असे करीत असतांना अनुकरणीय व्यक्ती फार मोठी कर्तृत्ववान असली पाहिजे. तो पुढे म्हणतो की, राजाने अनुकरण करण्याऐवजी आपल्या सदगुणांवर अवलंबून असणे केव्हाही उत्तम. मॅकियव्हिली दैवालाही वाजवी महत्व देतो. परंतू, माणसाने दैववादी बनून संधीची वाट बघत बसणे त्याला मान्य नाही. “ जे लोक यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती करताना बिचकत नाहीत, तेच लोक श्रेष्ट असतात.
!! अरुणभारती !!
Leave a Reply