पाश्चात्त्य राजकीय विचारवंत “ प्लेटो ”

Western Political Thinker “Plato”

(इ. स. पूर्व ४२४ ते इ. स. पूर्व ३४८)

      राजकीय विचारवंताच्या विचारांचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्‍या समकालीन परिस्थितीचा विचार करणे हे तो विचारवंत समजावून घेण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. याचे कारण असे की, कोणताही विचारवंत हा त्याच्या काळ आणि परिस्थितीचेच एक अपत्य असते. विचारवंत हा त्या त्या नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक इ, प्रकारच्या परिस्थितीतून उद्यास येत असतो आणि त्या परिस्थितीतील दोषांवर उपायोजना शोधून काढून ती परिस्थिती बदलण्यासाठी तो नवे विचार मांडत असतो.
      प्लेटोचे अथेन्स हे नगरराज्य केवळ चार पाच हजार लोवस्तीचे होते. नगरराज्याचा करभार लोकशाही व्यवस्थेनुसार होत असे. सर्व पुरुषांना राज्यकारभारात सहभागी होता येत असे. नैसर्गिक परिस्थितीनुसार ग्रीसमधील निरनिराळ्या राज्यात समाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या भिन्न परिस्थिती असे. वास्तवीक पाहता अथेन्स हे सर्वतोपरी एक आदर्श नगरराज्य होते, तरीही त्या आदर्श राज्याचा, संस्कृतीने दुय्यम असलेल्या स्पार्टासारख्या राज्याकडुन, पराभव व्हावा याचे प्लेटोला वैषम्य वाटत असल्याने त्याने आदर्शराज्याची आपली कल्पना मांडली.

प्लेटोची ग्रंथ संपदा

  • द रिपब्लिक  (The Republic)
गॉर्जियस हा ग्रंथ द रिपब्लिक या ग्रंथाची प्रस्तावणा म्हणावी लागेल
  • द स्टेटसमन  (The Statesman)
  • द लॉज   (The Laws)
     प्लेटोच्या सर्व ग्रंथांमध्ये “द रिपब्लिक” किंवा “आदर्श राज्य” हा ग्रंथ सर्वश्रेष्ट मानला जातो. प्लेटोच्या या आदर्श राज्याच्या सिध्दांन्ताचा कल्पनाविलास फारच मनोज्ञ आणि महत्वपर्ण आहे ‘Idea is real’ म्हणजेच “ जे आदशे असते आणि कल्पनेत बसते तेच सत्य असुन तेच वास्तवात उतरते”  असे प्लेटो म्हणतो हा विचार सिध्द करण्यासाठी त्याने कोणतीही वस्तु ही वास्तवात येण्यापूर्वी आधि ती एक “अमूर्त” कल्पना असते आणि मग ती वास्तव रुप धारण करते (अमूर्त – कल्पना  केलेली वस्तु. मूर्त – म्हणजे जे प्रत्येक्षात कल्पनेची कृती झाल्यानंतर प्रत्यक्ष वस्तु होय) कल्पनेतील राज्य ( आदर्श राज्य) हे ही वास्तवात आणता येईल असा प्लेटोचा दावा होता.  “द रिपब्लिक” हा ग्रंथ  “कल्पना आणि आकार” या संकल्पनेवर आधारला आहे. रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटोच्य राजकीय तत्वज्ञानाचा स्त्रोत मानला जातो. ग्रंथाचे प्रमुख शीर्षक “रिपब्लिक” असले तरी त्याचे उपशीर्षक “कन्सनिंग” (Concerning Justice) असे आहे.
     प्लेटोचा न्याय या संकल्पनेचा विस्तृत अर्थ असा कि, “ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला तिच्या गुणवत्तेनुसार स्थान प्राप्त होते, त्याच व्यवस्थेला तो “न्यायाचे राज्य” असे  म्हणतो. अशा व्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळून व्यक्ती आणि समाज यांचा विकास साधला जाईल असे गृहीत धरले जाते. प्रत्येक व्यक्तीला  आपल्या सर्वांगीण विासासाठी निसर्गाकडून व समाजाकडून काही हक्क प्राप्त होतात. परंतु, स्वत:चे हक्क बजावताना कोणत्याही व्यक्तीकडून दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा येण्याचे संभवते. याचाच अर्थ असा की एका व्यक्तीच्या हक्कांसाठी दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांचा लोप होऊन त्या व्यक्तीला न्याय मिळण्याऐवजी अन्याय सहन करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्लेटो ने न्यायाची बहुआयामी चर्चा केलेली आढळते. प्लेटोच्या म्हणण्या नुसार राज्यात व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या तीन मन:शक्तीनुसाल तीन वर्ग असतात
१)मन:शक्ती म्हणजे इच्छा (Will)
२) बुध्दी  (Intelligence)
३) विवेक (Rationality )
     या तीन मन:शक्तीनुसार निरनिराळया व्यक्तिसमूहांची मानसिकता बनते. प्लेटोचे म्हणणे असे की, न्यायासाठी व्यक्तीतील गुण हेरुन त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला काम दिलेगेले तर न्यायाची परिस्थिती निर्माण करता येईल १. ज्या व्यक्तिच्या अंगी इच्छा किंवा वासना प्रकर्षाने असते, त्या व्यक्तीला शारीरिक श्रमाची कामे देणे उचित २. चैतन्य आणि धीरोदत्तता हे गुण असणाऱ्या व्यक्ती पराक्रम गाजवणे, र्शोर्य यांच्याशी  निगडीत असलेली कामे करु शकताता. म्हणजेच हते चांगले योध्दे होऊ शकतात. ३.ज्या व्यक्तीच्या अंगी बुध्दी आणि विवेकशीलता असते, त्यांचे धनसंचयाकडे किंवा पराक्रम गाजवण्याकडे लक्ष असण्यापेक्षा ज्ञानसाधनेत अधिक लक्ष असते. त्याने गुण वैशिष्ट्यांनुसार समाजाचे तीन वर्ग पडतात १) कष्टकरी कामगारांचा २)संरक्षक आणि योध्दांचा ३) बुध्दिवंतांचा या तीन प्रकारच्या व्यक्तींमुळे समाजाच्या सर्व गरजा भागुन प्रत्येकाला न्याय मिळण्याची शक्यता असते “ तो म्हणतो इच्छा, र्धेर्य या जरी नैसर्गिकवृत्ती असल्या तरी त्यांचा वापर अतिरीकाने केल्यास अनर्थ ओढवणे अटळ असते ”. या गुणवैशिष्ट्यांवर आणि प्रवृत्तींवर विवेकशीलतेचे बंधन नसेल तर अराजकता माजून सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यावर बुध्दिमत्ता आणि विवेकशीलतेचे बंधन असले पाहिजे असे प्लोटो मांडतो.

!! अरुणभारती !!

2 responses to “पाश्चात्त्य राजकीय विचारवंत “ प्लेटो ””

  1. Siddhesh Gadekar Avatar
    Siddhesh Gadekar

    Veri Informative Content in Marathi language

  2. Kamble Tathagat Dashrath Avatar
    Kamble Tathagat Dashrath

    All are such a great Articles. Continue doing this, i’m proud of you bro.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *