11th Admission 2025-26
11th Admission 2025-26 पारंपारीक पध्दतीने होणारे प्रवेश प्रक्रिया आता सुरळीत झाली आहे. विविध प्रकारच्या भुलथापाणा विद्यार्थि व पालक वर्ग बळी पडत होता तो या प्रक्रिये मुळे त्याला सुलभतेचा अनुभव घेतांना आपणास दिसेल., प्रक्रिया पुढली प्रमाणे
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया :-
11th Admission 2025-26 (१) राज्यातील सर्व क्षेत्राकरीता उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांचेशी संलग्न सर्व शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतुदी लागु राहतील.
(२) राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इयत्ता ११ वीच्या प्रवेशाकरीता या शासन निर्णयातील तरतूदी लागु राहतील.
(३) शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचे इयत्ता ११ वी चे प्रवेश केंद्रीय पध्दतीने व ऑनलाईन प्रणाली द्वारा करण्यात यावे. तर शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून HSVC व्यवसायिक चे प्रवेश ऑफलाईन पध्दतीने होतील.
(४) खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विहित कालमर्यादेत आवश्यक कागदपत्रे वरीष्ठ कार्यालयांना उपलब्ध करून देणे, विहित मुदतीत माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे, इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विहित मुदतीत करणे, याबाबत शाळा स्तरावरील कामकाज पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी खाजगी व्यवस्थापनाची असेल. इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व गुणवत्तेच्या आधारे करण्यात यावी.
(५) खाजगी व्यवस्थापनाने माहिती देण्यास विलंब करणे, टाळाटाळ करणे, खोटी/दिशाभूल करणारी माहिती सादर करणे, इत्यादीकरीता खासगी व्यवस्थापनास दंड आकारणे, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशास मनाई करणे, इत्यादी व आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
(६) विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल. विद्यार्थांना कोणत्याही एका शाखेकरीता अर्ज करता येईल.
(७) इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल. बनावट कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून सन २०२५-२६ करीता प्रतिबंधित करण्यात येईल.
11th Admission 2025-26 (८) इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता ११ वी प्रवेशाकरीता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
(९) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इ. ११ वी ऑनलाईन प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल. सर्वसाधारण चार फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल. सर्व प्रवेश इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे करण्यात येतील. राज्य मंडळ संलग्नित इयत्ता १० वी मधील विषयांच्या उच्चतम ५ विषयांचे गुण गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात यावेत. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळांच्या माध्यमिक स्तरावरील इयत्ता १० मधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य ५ विषयांमधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरीता विचारात घेण्यात येतील. समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्म दिनांकानुसार जेष्ठतम विद्यार्थ्यांच्या प्रवेशास प्राधान्य देण्यात येईल. या दोन स्तरावर (गुण व जन्मदिनांक) समान असल्यास विद्यार्थी, पालक, आडनाव इंग्रजीमध्ये घेऊन वर्णाक्षरांच्या क्रमानुसार जेष्ठतेनुसार प्रवेश करण्यात येतील.
(१०) सर्वसाधारण ४ फेऱ्यांचे गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येईल. यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल. तद्नंतर “सर्वांसाठी खुली (OPEN FOR ALL)” या विशेष फेरीचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा दाखविण्यात येतील. उर्वरीत रिक्त जागांकरीता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता १० वी च्या प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चित करण्यात येतील. याकरीता संगणकीय प्रणालीचा व ऑनलाईन पध्दतीचा उपयोग करून प्रवेश देण्यात येतील.
11th Admission 2025-26 (११) अल्पसंख्यांक कोटा अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक विद्यालय/कनिष्ठ महाविद्यालयांना अल्पसंख्यांक कोटा ५० टक्के असेल. या कोट्यामधील जागा शाळा व्यवस्थापनास सर्वसाधारण नियमित फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असेल. सर्वसाधारण नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत अल्पसंख्यांक कोट्यातील जागा कोणत्याही परिस्थितीत प्रत्यार्पित करता येणार नाहीत. भरलेल्या जागांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येतील. त्यानुसार कार्यवाही करणे व्यवस्थापनास बंधनकारक असेल. या कोट्यामधील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रवेश झाल्यास उर्वरित रिक्त जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्यार्पित करता येतील. अल्पसंख्यांक विभागाच्या दिनांक १८/०६/२०१४ च्या शासन निर्णयातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेश करताना त्या-त्या समूहातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत. त्या समूहातील विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास धार्मिक व भाषिक दर्जानुसार अंतर्गत बदलाप्रमाणे प्रवेश करता येतील. तद्नंतरही जागा रिक्त राहिल्यास प्रत्यार्पित रिक्त जागांसाठी सामाजिक व समांतर आरक्षणाचे तत्व बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या प्रवेशाप्रमाणे असेल.
(१२) व्यवस्थापन कोटा सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोट्याअंतर्गत ५ टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्यातील जागा सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत गुणवत्तेनुसार भरता येतील. तद्नंतर तिसऱ्या फेरीच्या टप्यावर या कोट्यातील प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाल्यास उर्वरित रिक्त जागा प्रत्यार्पित करणे अनिवार्य असेल. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना व्यवस्थापन कोटा लागू राहणार नाही.
(१३) इन-हाऊस कोटा इन-हाऊस कोट्याअंतर्गत खाजगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. या कोट्याअंतर्गत भरण्यात येणाऱ्या जागा गुणवत्तेनुसार ऑनलाईन पध्दतीने भरण्यात याव्यात. उच्च माध्यमिक शाळा असलेल्या परिसरात/आवारात माध्यमिक शाळा असल्यास या माध्यमिक शाळेतील उमेदवारांना हा कोटा लागू असेल. बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळांना इनहाऊस कोटा लागू असेल. सर्वसाधारण नियमित दुसरी फेरी संपेपर्यंत या कोट्यातील जागा भरता येतील. तद्नंतर सदर जागा रिक्त असल्यास प्रत्यार्पित करणे व्यवस्थापनास अनिवार्य असेल. राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इन-हाऊस कोटा ५० टक्के असेल. या कोट्याकरीता इयत्ता १० वीची परीक्षा राज्यातील शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पात्र असतील.
(१४) विद्यार्थ्यांनी द्यावयाचा पसंतीक्रम, प्रवेश रद्द करणे, प्रवेश न घेतल्यास प्रतिबंधित करणे यासंदर्भातील कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहील.
(१४.१) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरिता प्राधान्य क्रम भरताना किमान १ प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल व कमाल १० पसंतीक्रम भरता येतील. प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना “सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)” या फेरी पर्यंत दुसरी/तिसरी व चौथी फेरी मध्ये सहभागी होता येणार नाही. नियमित फेरीमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात जागा मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असेल. प्रथम प्राधान्यक्रम असलेले शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी
(१५) प्रत्यक्ष प्रवेशित झालेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय/वरिष्ठ महाविद्यालय यांना प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेता येईल. दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ला उच्च माध्यमिकचे अध्यापन व अध्ययनाचे कार्य सुरु करणे उच्च माध्यमिकच्या सर्व शाखांना आवश्यक असेल.
(१६) नियमित चार फेऱ्या संपल्यानंतर विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे. “सर्वांसाठी खुला (OPEN FOR ALL)” या विशेष फेरीमध्ये ऑनलाईन पध्दतीने रिक्त जागा असल्यास विद्यार्थ्यांना तेथे गुणवत्तेनुसार प्रवेश घेण्याची मुभा असेल.
(१७) प्रती विद्यार्थी प्रवेश नोंदणी करताना रुपये १००/- एवढे शुल्क आकरण्यात येईल. सदर शुल्क ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येईल. त्याकरीता संचालक व सहाय्यक संचालक लेखा यांचे संयुक्त खाते सुरू करण्यात यावे.
प्रवेशाचे वेळापत्रक :-

FAQ | ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
1) प्रवेश प्रक्रिया काय आहे?
संपूर्ण प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्यात येणार आहे, कोणत्याही इतर पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही.
2)ऑनलाईन अर्ज कसा भरायचा?
विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा आहे.
3) आव्हाने आणि मदत
प्रवेशासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मदत करण्यासाठी तांत्रिक सहाय्य उपलब्ध आहे.
Leave a Reply