Plato: The Great Philosopher of the Ideal State, Justice, and Knowledge. प्लेटोचा जन्म इ. स. पूर्व ४२७ मध्ये अथेन्स येथील एका श्रींमत घराण्यात झाला. त्याचे वडील राजघराण्यातील वंशज होत, व आई ही शास्त्री घराण्यातील संबधीत होती प्लेटो हा अथेन्स राज्याचा रहिवासी होता. तसाच तो साक्रेटीस सारख्या महान गुरुचा शिष होता. ज्या साक्रेटीसचा खून तत्कालीन राजघराण्यांनी घडवून आणला होता. या घटनेचा प्लेटोच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता त्याकाळी अथेन्सच्या लोकशाही व्यवस्थेची उतरती कळा थांबावी म्हणून प्लेटोने आदर्श राज्य निर्मितीसाठी आपले राजकीय विचार मांडले होते.
अथेन्यजवळ एका ॲकॅडमीची स्थपना त्याने केली जे ग्रीसमधील राजकीय चितंनाचे विचारांचे केंद्र बनले असा हा तत्वज्ञ राजकीय विचारवंत इ. स. पूर्व ३४७ ला वयाच्या ८१ वर्षी काळाच्या पडद्याआउ गेला.

प्लेटोने लिहलेले ग्रंथ :-
प्लेटोने जवळजवळ ३८ ग्रंथ लिहीलेत त्यातील काही महत्त्वाचे ग्रंथ
१. The Republic (दि रिपब्लिक / राज्य)
प्लेटोचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ.
न्याय, आदर्श राज्य, शिक्षण आणि तत्त्वज्ञ-राजा (Philosopher King) यांची संकल्पना मांडली आहे.
२. The Laws (द लॉज)
प्लेटोचा शेवटचा आणि सर्वात मोठा ग्रंथ.
कायदे, शासनव्यवस्था आणि नागरिकांचे कर्तव्य यांची चर्चा.
३. Statesman (स्टेट्समन)
आदर्श शासकाचे गुण आणि राज्यकारभाराचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
४. Apology (अपॉलॉजी)
Socrates यांच्यावरील खटल्याचे वर्णन आणि त्यांचे विचार.
५. Crito (क्रिटो)
कायद्याचे पालन आणि नैतिक कर्तव्य यांवर चर्चा.
६. Phaedo (फेडो)
आत्म्याचे अमरत्व आणि मृत्यूविषयी विचार.
७. Symposium (सिंपोजियम)
प्रेम (Love) आणि सौंदर्य यांचे तात्त्विक विश्लेषण.
८. Meno (मेनो)
ज्ञान, शिक्षण आणि सद्गुण यांवर चर्चा.
९. Timaeus (टिमेयस)
विश्वनिर्मिती आणि निसर्गाविषयी विचार.
१०. Gorgias (गॉर्जियास)
वक्तृत्वकला, नैतिकता आणि न्याय यांचे विश्लेषण.
प्लेटोच्या न्यायाविषयक सिद्धांत :-
प्लेटोने रिपब्लीक या ग्रंथामध्ये न्यायाविषयक विचार मांडला आहे. प्लेटोच्या न्यायाविषयक संकल्पनेचा अर्थ हा मर्यादित नसून तो नैतिकतेशी जोडणारा आहेख् प्लेटो म्हणतेा, राज्यांतील व्यक्तीव राज्या हे एकच प्रकारच नाणं असावे म्हणजेच. राज्यरूपी शराीराचा आत्मा होय. प्लेटो सांगतो की व्यक्तीच्या अंगातील गुणविशेष व समाजातील विविध घटक यांचा परस्परांशी संबंध असतो.
प्रत्येक व्यक्तीच्या ठिाकणी तीन गुणविशेष असतात.
१. बुद्धी
२. साहस शौर्य
३. वासना सहायन
यातून समाजातील तीन वर्ग निर्माण होतात.
| व्यक्तीचे गुण | वर्ग | कार्य |
| बुद्धी, विवेक | शासन वर्ग | राज्यकारभार चालवणे |
| साहस शौर्य | सैनिक वर्ग | देशाचे संरक्षण करणे |
| वासना सहायन | उत्पादन | शेती व्यापार करणे . |
यामध्ये ज्याला आपण नैतीकता म्हणतो. तो म्हणतो की तो म्हणजे प्लेटोच्या न्याय होय.
प्लेटोच्या न्यायसिद्धांताचे वैशिष्ट्ये:-
१. व्यक्तीगत प्रवृत्तीशी निगडीत :-
व्यक्तीमध्ये बुद्धी शौर्य वासना तर मुख्यता ३ गुण हे गुण आढळतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये यातील एखादा गुण तरी काही प्रमाणात आढळतो ,त्या गुणानूसार त्याने काम करावे अशा कामावर आधारित प्लेटोचा न्याय होय.
२. कार्याची विभागणी :-
बुद्धीमान व्यक्तीने राज्यकत्याचे काम करावे, साहस प्रधान व्यक्तीने श्रमाचे काम करावे त्याच्यातील गुणानुसार त्यांनी शाख निवडल्यास ती व्यक्ती कुशलता नैपून्य वापरुन कार्य करु नेकत दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नये..
३. आत्माने निगडित :-
प्लेटोची न्याय संकल्पना हा आत्माशी निगडीत आहे तो व्यक्तीच्या आंतरिक आवाज आहे. व्यक्तीच्या गुणानुसार कार्य मिळाल्यास त्याला आत्म समाधान मिळते.
४. न्यायालयाला स्थान नाही :-
आपन आपल्या गुणानुसार कार्य पार पाडले व इतरांच्या कामात हस्तक्षेप केले नाही म्हणजे तेथे आपोआपच न्याय प्राप्त होईल व न्यायालयातील न्यायाधीश व वकीलांची गरज नसेल असे आदर्श राज्य प्रस्थपिक होईल.
५. नैतिकता:-
आपन आपल्या गुणानुसार वर्ग करणे हे व्यक्तीने नैतिक कर्तव्य आहे. त्याचा न्याय सिध्दांत नैतिकतेवर आधारित आहे. आदर्श राज्याच्या उभारणीसाठी प्लेटोने प्रामाणिक चारित्र्य संपन्न सदगुणी नागरिकांची अपेक्षा केली जाते. व्यक्तीचा आत्मसमी असतात कोणत्याही मोहापासून अलिप्त राहु शकतो.
संदर्भ ग्रंथ :-
FAQ | सतत विचारले जाणारे प्रश्न.
1. प्लेटो कोण होता?
प्लेटो हा प्राचीन ग्रीसमधील एक महान तत्त्वज्ञ होता. तो Socrates यांचा शिष्य आणि Aristotle यांचा गुरु होता.
2. प्लेटोचा जन्म कधी झाला?
प्लेटोचा जन्म इ.स.पूर्व 427 च्या सुमारास Athens येथे झाला.
3. प्लेटोचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे?
प्लेटोचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे The Republic होय. या ग्रंथात आदर्श राज्य, न्याय आणि शासनव्यवस्थेची चर्चा केली आहे.
4. प्लेटोच्या तत्त्वज्ञानातील ‘आदर्श राज्य’ म्हणजे काय?
प्लेटोच्या मते आदर्श राज्य हे न्याय, सद्गुण आणि ज्ञान यांवर आधारित असावे. अशा राज्याचे नेतृत्व तत्त्वज्ञ-राजाने (Philosopher King) करावे.
5. प्लेटोची ‘ज्ञानसिद्धांत’ (Theory of Knowledge) काय आहे?
प्लेटोच्या मते खरे ज्ञान हे इंद्रियानुभवावर नव्हे तर बुद्धी आणि तर्कावर आधारित असते.
6. प्लेटोची ‘रूपसिद्धांत’ (Theory of Forms) काय आहे?
या सिद्धांतानुसार भौतिक जगातील वस्तू या केवळ आदर्श आणि शाश्वत रूपांच्या प्रतिकृती आहेत.
7. प्लेटोने कोणती शैक्षणिक संस्था स्थापन केली?
प्लेटोने Academy नावाची संस्था स्थापन केली, जी जगातील पहिल्या उच्च शिक्षण संस्थांपैकी एक मानली जाते.
8. प्लेटोचा आधुनिक जगावर काय प्रभाव आहे?
राजकारण, शिक्षण, नैतिकता आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांवर प्लेटोच्या विचारांचा आजही मोठा प्रभाव आहे.
9. प्लेटो आणि सॉक्रेटिस यांच्यात काय संबंध होता?
प्लेटो हा Socrates यांचा प्रमुख शिष्य होता आणि त्याने आपल्या अनेक संवादग्रंथांत सॉक्रेटिसचे विचार मांडले आहेत.
10. प्लेटोचे निधन कधी झाले?
प्लेटोचे निधन इ.स.पूर्व 347 च्या सुमारास झाले असे मानले जाते.