इ. स. १४६९ ते इ. स. १५२७
जीवनचरित्र :-
मॅकियाव्हली | Niccolo Machiavelli मॅकियाव्हली जन्म हा इटली मधील फ्लॉरेन्स येथे १४६९ मध्ये सामान्य कुटुंबात झाला. वडील हे व्यवसायाने वकील होते. मॅकेयाव्हली स्वत:च्या प्रयत्नाने १४९० मध्ये सामान्य प्रशासकीय नोकरीला लागला १४९८ ते १५१२ पर्यंत तो फ्लॉरेन्स प्रजासत्ताकाच्या दुसऱ्या चान्सरी (Second Chancery) चा सचिव होता. तो रोम, पॅरिस आणि इतर युरोपीय राजदरबार यांच्या राजदराबारात गेला. तेथील राजकीय परिस्थितीच अभ्यास केला. राजकारणाचा व मुत्सूदधीकरणाचा त्याच्या विचारांवर प्रभाव पडला १५१२ मध्ये लॉरेन्समध्ये मोठे राजकीय वादळ उठले व त्याला एका वर्षाची शिक्षा झाली. निवृत्तीनंतर तो एका खेड्यात शांतपणे जीवन जगला. The Prince हा ग्रंथ लॉरेन्झो दि मेदीची (Lorenzo de’ Medici) यांना अर्पण करण्यात आला.व १५२७ मध्ये त्याचा मूत्यू झाला.

मॅकेव्हेलीवर पडलेला प्रभाव :-
मॅकियाव्हली वर तत्कालीन परिस्थिती व सोभवतालचा प्रभाव पडतो.
१) इटलीची दूर्दशा :-
मॅकियाव्हलीच्या काळात इटलीची परिस्थिती ही चिंताजनक बनली होती. इटलीने स्वतंत्र गमावले होते.त्यातून हुकुमशाही निर्माण झाली होती लोकांमध्ये राजकीय निष्ठा व बुद्धी नष्ट होत आहे. असे जाणवत होते परिणाम खुन कैद हद्दपारी बेसूमार वाढी होती. इटलीचे पाच भागात विभाजन होऊन ऐक्य नष्ट झाले होते त्यामुळे फ्रान्स, जर्मन, स्पेन, यांना इटली ही युद्धभूमी वाटत होती.
२) नितीमत्तेचा ऱ्हास:-
संपूर्ण इटली नितीमत्तेचाऱ्हास झाला होता राजकीय नेते व सैनिक स्वत:चा स्वार्थ साधत नाही राष्ट्रवाद नाहीसा झाला राष्ट्र उभारण्यासाठी नैतिकतेची जाणीव निर्माण करण्याची गरज म्हणून या परिस्थितीतूनवर काढण्यासाठी गंभीर अशा परिस्थिची आवश्यकता होती.
३) लोकशाही शक्तीची पिछेहाट :-
मॅकियाव्हलीच्य नजरेतून तष्क्ालीन परिस्थिती सुद्रू शकती नाही. तिने लोकशाहीची मागणी केली परंतू बलवान शी राजेशाही पूऐ टिकाव धरू शकली नाही. चर्चच्या पोपचे वर्चस्व प्रस्थापित केले राजकीय क्षेत्रात राजाने सरजामदारांचा पराभव करुन सत्ता आपल्या आधीन केली. या सर्वच गोष्टीचा परिणाम मॅकियाव्हलीवर झालाख्ख् म्हणून समर्थ प्रशासकाशिवाय इटलीचे स्वातंत्र्य मिळणार नाही. अशी धारणा होती.
४) नव्या युगाची पहाट :-
या काळात, नवे, शोध नव्या, कला, नवे साहित्य निर्माण होऊ लागले. तसेच धर्म निती, चालीरीती याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन निर्माण झाला. म्हणून फॉरेन्समध्ये नव्या युगाचा नांदीची सूरवात झाली (एककेंद्र) या विचाराचा परिणाम हा मॅकियाव्हलीवर झालात्यातूनच त्याचे राजकीय विचार निर्माण झालेत. धर्मातील राज्याच्या नवा विचार त्याने मांडला.
५) ग्रीक तत्वज्ञानाचा प्रभाव :-
मॅकियाव्हलीवर ॲरिस्टॉटलच्या विचारांचा प्रभाव पडला मॅकियाव्हलीने ॲरिस्टॉअलपासून व्यवहारी व वास्तवादी दृष्टीकोन स्विकारला व इटलीच्या दृष्टीने त्याने विचार केला यातूनच मॅकियाव्हलीने तत्वज्ञान विकास पावले.
!! अरुणभारती !!