Political Culture in Marathi | राजकीय संस्कृती – अर्थ, विकास, प्रकार, गॅब्रिएल आल्मंड | राज्यशास्त्र नोट्स
Political Culture राजकीय संस्कृती हि राज्यशास्त्रातील एक लोकप्रिय संकल्पना बनली आहे. हि संज्ञा प्रथमतः गॅबिअल ऑल्मड १९५६ मध्ये राजकीय व्यवस्थांच्या तौलनिक अभ्यासावरील आपल्या लेखामध्ये मांडली. राजकीय संस्कृती हि संकल्पना प्रामुख्याने मानवशास्त्र व समानशास्त्रातील संस्कृती या संकल्पनेवर आधारीत आहे.
राजकीय संस्कृती प्रामुख्याने व्यक्तिगत राजकीय वर्तनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. हा अभ्यास सूक्ष्म पातळीवर जाऊन केला जातो. काही लोक ठराविक मार्गानेच का वागतात याच्या अभ्यासासाठी राजकीय संस्कृती मदत करते.
पुढे सामाजिक शास्त्रांज्ञाना असे वाटले की, फक्त वर्तनाचा अभ्यास करून चालणार नाही, त्यामुळे त्यांनी मूल्ये, दृष्टिकोन यांचा अभ्यास वर्तन समजण्यासाठी करण्यास सुरुवात केली. यातूनच राजकीय संस्कृती विकसित होत गेली. राजकीय संस्कृती General (सामान्य) संस्कृती एक भाग केवळ विश्लेषणाच्या हेतूसाठी आपण दोन्ही वेगळे बघत असतो ब्रिटन मध्ये क्रांतीचा अभाव याचे कारण तेथील समावेशक राजकीय संस्कृती हि General Culture ला सुसंगत आहे राजकीय संस्थाया एकमेकांस सुसंगत असाव्या. कारण Participant Culture असणाऱ्या ठिकाणी एकाधिकरशाही टिकू शकत नाही, तर Subject Culture असणाऱ्या ठिकाणी लोकशाही टिकणार नाही .

विकास:-
आल्मंडच्या मते, राजकीय संस्कृतीचा विकास खालील घटकांच्या प्रभावांमुळे झाला.
१) सामाजिक मानसशास्त्र व मानवशास्त्र – या अभ्यासकांच्या मते दृष्टीकोन & व्यक्तिगत वर्तनाला आकार देणाऱ्या घटकांचा अभ्यास आवश्यक आहे. . त्यातुनच गटांची मुल्ये, सवयी आणि पध्दती, व्यक्तिगत विकास इ. बद्दल कुतुहल निर्माण झाले.
२) युरोपियन समाजशास्त्र :- यावर प्रामुख्याने वेबर, पेरॅटो आणि उरकेहम यांचा प्रभाव दिसतो. वेबरने मार्क्सला सांस्कृतिक मुद्यावर अवाहन देताना आर्थिक कृती व राजकीय रचना यांना प्रभावित करण्यात धर्म व मुल्ये महत्त्वाची आहेत.
३) सवैक्षण संशोधन :- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास, मुलाखती, माहितीचे विश्लेषण यामुळे राजकीय गोष्टींचा मानस सांस्कृतिक माहिती गोळा करण्यात प्रोत्साहन मिळाले.
या तीन गोष्टीच्या माध्यमातुन राजकीय संस्कृतीचा विकास होण्यास मदत झाली.
!! अरुणभारती !!