भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सोव्हित कम्युनिस्ट क्रांतीमूळे मार्क्सवादी लेनिनवादी विचारांचे आकर्षण वाटून जगभरामध्ये कम्युनिस्ट संघटना स्थापन झाल्या. मार्क्सवादी विचारसरणीचा प्रसार आणि कम्युनिस्ट इंटरनेशनलच्या माध्यमातून भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भारतामध्ये १८५७ पासून ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी संघटित लढा सुरु झालाख् आणि त्यास १९१७ चया रशियन क्रांतीने नवे बळ व नवा आशय दिला त्यातूनच ब्रिटिश राजवट नष्ट करण्याच्या उद्देशाने देशात कम्यूनिस्ट गट सक्रिय होऊ लागले.

भारतामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापने संदर्भात मतभेद दिसून येतात. मानवेंद्रनाथ रॉय, मुझफ्फर अहमद, अंबनी मुखर्जी , मौलाना हसरत मोहानी इत्यादींच्या पुढाकाराने १७ ऑक्टोबर १९२० रोजी ताश्कंद येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्याचप्रमाणे १९२५ साली कानपूर परिषदेमध्ये स्थापन झालेला खरा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे असे सांगण्यात येते.
!! अरुणभारती !!
संदर्भ :-
१) समाजशास्त्र विश्वकोष
२) राज्यशास्त्र कोष
३) सत्ता संघर्ष – सुहास पळशीकर
४) सत्त्ता संतूलन – सुहास पळशीकर
५) १५ व्या लोकसभा निवडणूकीचा आढावा – ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीचे प्रकाशन)