स्वातंत्र्योत्तर काळातील दलित व ओ.बी.सी. राजकारण
प्रस्तावणा
रामजन्मभूमीपासूनच भारतात अस्पृश्य असा मानला गेलेला एक वर्ग होता. त्यांच्यात जाणीव जागृती करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी प्रयत्न केले . त्यात महात्मा फुले, पेरियार, डॉ. आंबेडकर यांचा महत्वाचा वाटा आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळाची पार्श्वभूमी
दलित राजाकरणाची सुरुवात स्वांतत्र्यपूर्व काळात झाली. दलितांना राजकाणात सहभागी होता यावे यासाठी १९३५ च्या प्रांतीक निवडणू होणार होत्या. त्यामुळे या निवडणूकात सहभागी होण्यासाठी १९३६ मध्ये “स्वंतत्र मजूर पक्षाची स्थापना” केली. दलितांना / अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ असावेत यासाठी त्यांनी लढा दिला होता. पुढे भारताची फाळणी झाली आणि विभक्त मतदारसंघ फारसे प्रभावी ठरु शकलार नाहीत. आणि केवळ दलितांचे संघटन पुरेसे नाही हे त्यांच्या लक्षात आले त्यातून पुढे “भारतीय रिपब्लिक पक्षाची” स्थापना करण्याचे ठरवले. पक्षाची स्थापना डॉ. आंबेकरांनी दलितांना निवडणूकांत सहभाग घेता यावा यासाठी पक्षस्थापनेचा विचार केला. परंतू भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यापूर्वीच डॉ. आंबेडकरांचा मृत्यू झाला. या कारणाने पुढे त्यांच्या अनुयायांनी १९५६ मध्येया प क्षाची स्थापना केली.”शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या” जागी हा पक्ष स्थापन करण्यामागे आंबेडकरांनी एक महत्वाची भूमिका होती. ती म्हणजे “दलित आणि इतर मागासवर्गी यांना संघटित करणे” मात्र आंबेडकर अनुयायांनी हा पक्ष स्थापन केला आणि त्यात पूढे लवकरच फुट पडली यास कारण म्हणजे नेतृत्व प्रस्थापित करणे आणि इतर काही होती. यात यशवंतरावाच्या अध्येक्षतेखाली दलितांना ओढून घेण्याचा प्रयत्न कॉग्रेसने केला होता. या काळात कॉग्रेसने दलित नेतृत्वाला आपल्याकडे ओढण्यास सुरुवात केली त्यामुळे दलित राजकाणाचा मुद्दा बाजूला पडला मात्र सामाजिक पटलावर दलितांची घुसळण होऊ लागली.
या काळात १.घटनेने अस्पृश्यता पाळणे गुन्हा ठरवला. २. दलितांमधील एक वर्ग शिक्षण घेत होता. ३. दलितांना राखीव जागा ठेवण्यात आल्या . या तीनही घटनेमधून दलित वर्ग शिक्षित झाला जागृत झाला. आरक्षणाच्या माध्यमातून पूढे आला हे सर्व होत असताना देखील अस्पृश्यता नष्ट झाली असे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात देखील मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता पाळली जाते विशेषत: खेडे गावामध्ये दलित अधिकाराविषयी हिंसक प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका बाजूला दलितांच्या जीवनात बदल होत होते आणि नव्हतेही. या सवांमध्ये दलित नेतृत्व, दलित राजकारणात दिसत नव्हते, कारण RPI पक्षाअंतर्गत वादविवाद सुरु होते. या पक्षातील काही नेते कॉग्रेसकडे गेलेले दिसतात. त्यामुळे दलित राजाकरणामध्ये एक पोकळी निर्माण झाली.
दलित राजकारणात निर्माण झालेल्या पोकळीतूनच २९ मे १९७२ झाली महाराष्ट्रात “दलित पॅथर” या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे नेतृत्व हे सुशिक्षीत लेखक , कवी, साहित्य क्षेत्रातील होते, आणि या माध्यमातून त्यांनी दलितांच्या बाजूने लढण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी जाऊन त्यांचे निर्मुलन करणे या संबधी सरकारला त्यावीर कृती करावयास भाग पाडणे. खेडेगावात जाऊन त्यांनी कार्य केले. अशा प्रकारचे कार्य ही संघटना करु लागली. मात्र पुढे या संघटनेत फुट पडली. मार्क्सवाद कि बौध्द धर्म या कारणाने. यातून दोन गट पडले १. नामदेव ढसाळ यांनी कम्युनिस्टांची बाजू घेतली. तर २.राज्या ढाले यांनी बौध्द धर्माची बाजू घेतली.
या फुटितून या संघटनेचा प्रभाव कमी होत गेला. याचा फायदा घेऊन “काशिराम यांनी बामसेफ” (बॅकवर्ड ॲण्ड माईनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉइज फेडरेशन) ची स्थापना केली. ही संघटना दलित राजकारणात अर्थसहाय्य करेल तसेच बौध्दीक बळही पुरवेल अशी भूमिका घेतली कारण यात मध्यम वर्ग अधिक होता. आणि त्यांचे नेतृत्वही मध्यम वर्गाचे होते. पुढे त्यांनी १९८० च्या दशकात “डी.एस.फोर” स्थापन केली आणि पुढे”बसपा” या पक्षाची स्थापना केली यात वंचित घटकांना सामावून घेतले आणि त्यास बहुजन असे म्हटले आहे. पूढे लवकरच हा पक्ष उत्तरप्रदेशच्या राजकारणात स्थिरावला १९९३ मध्ये समाजवादी पक्ष (सपा) आणि बसपा याची युती कॉग्रसच्या पाठिंव्याने आली. मात्र पुढे लवकरच ही युती तुटली १९९५ ला भाजपच्या पाठिंब्याचे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती या मुख्यंमत्री बनल्यामुळे हिंदुत्व राजकारणाला जातीय राजकारण छेद देईल ही आशा मावळली आणि लवकरच मायावतीच्या लक्षात आले की केवळ वज्रक राजाकरण उच्च जातींना बगळून राजकारण शक्य नाही . म्हणुन त्यांनी सर्वजन हा शब्दप्रयोग केला. २००१ मध्ये बसपाचे पूर्ण बहुमताने सरकार सत्तेवर आले.
मात्र दलित राजकारण हे एक प्रदेशापुरते मर्यादित राहण्याबरोबरच ते बहुजनापासून सर्वजनापर्यंत गेल्याचे आपणास दिसते.
!! अरुणभारती !!