Vivah Nodani Form | विवाह नोंदणी  अर्ज

विवाह संबंधी महत्वाचे अधिनियम

१. हिंदू विवाह अधिनियम, १९५५

२. मुस्लिम विवाह विघटन अधिनियम, १९३९

३. पारशी विवाह आणि विवाह विच्छेद अधिनियम, १९३६

४. भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम, १८७२

५. विशेष विवाह अधिनियम, १९५४ (आतंरजातीय विवाह नोंदणी या कायद्याद्वारे केली जाते.)

६. हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ ७. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६

विवाह नोंदणी  अर्जासोबत खालीलप्रकारची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

१) वर व वधु यांच्या वयाचा पुरावा :- शाळा सोडल्याचा दाखला/पासपोर्ट/जन्माचा दाखला/एस.एस.सी परिक्षेच्या प्रमाणपत्राची प्रत / अधिवास दाखला यापैकी एक.

२) वर व वधु यांच्या राहण्याचा पुरावा :- रेशनकार्ड/इलेक्शन कार्ड/पासपोर्ट / लाईट बील (स्वतःच्या नावे)

एम टी एन एल बील (स्वतःच्या नावे) यापैकी एक. (विशेष महत्वाची सुचना वधुचा लग्नाअगोदरचा रहिवास पुरावा असणे आवश्यक आहे.)

३) तीन साक्षीदारांचे रहिवास पुरावे (रेशनिंगकार्ड/इलेक्शनकार्ड/पासपोर्ट) यापैकी एक.

४) पक्षकार घटस्फोटित/विधुर/विधवा असल्यास न्यायालयाचा हुकुमनामा / नगरपालिका मृत्यू दाखला जोडणे आवश्यक आहे.

५) मुळ लग्नपत्रिका, लग्नपत्रिका नसेल तर जॉईंट डिक्लेरेशन १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर करणे.

६) सर्व पुराव्यांची साक्षांकित झेरॉक्स प्रत करून घेणे तसेच ओरीजिनल (मुळ प्रत) नोदणीच्या वेळी निबंधकास पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. (पडताळणीनंतर त्वरीत परत केली जातील.)

७) १०० रूपयांचे कोर्ट फी स्टॅम्प.

८) वर व वधु यांचे प्रत्येकी सहा पासपोर्ट साईज फोटो, तसेच तीन साक्षीदारांचे प्रत्येकी तीन फोटो.

९) लग्नाचा एक फोटो.

१०) ॲफिडेव्हींट

११) मालमत्ता कर भरणा पावती.

१२) फक्त महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेल्या विवाहाकरीता हा नमुना विधिग्राहय आहे.

!! अरुणभारती !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *