लोकप्रशासन Public Administration

लोकप्रशासन Public Administration

        आधूनिक काळात लोकप्रशासन हे अत्यंत महत्वाचे व आवश्यक शास्त्र म्हणुन ओळखले जाते. प्रगत व अप्रगत अशा सर्वच राष्ट्रांत लोकप्रशासनशास्त्र आपणास आढळते. “मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकास करणे हा राज्यसंस्थेचा प्राधान्य हेतु साध्य करण्यासाठी योग्य व कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते”. प्रत्येक देशात लोककल्याणासाठी विविध योजना , उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. त्या योजना व उपक्रम राबवण्यासाठी राज्यसंस्थेला “ प्रशासनव्यवस्था निर्माण करुन त्या मार्फत अबंलबजावणी करावी लागते ”. प्राचीन काळात तसेच मध्ययुगीन काळात लोकप्रशासनशास्त्र अस्तित्वात होते. त्यामुळे प्रशासकीय स्वरुपही मर्यादीत होत. आधूनिक काळात समाजव्यवस्थेचे स्वरुप आधिक जटिल झालेले आहे की, प्रशासनशास्त्राच्या मदतीशिवाय समाजजीवन सुव्यवस्थित व सुखी  करणे  अशक्य झाले आहे.

        आधुनिक काळातील मानवाच्या गरजा इच्छा, अकांक्षा वाढलेल्या आहेत मानवाच्या सामाजिक आणि भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनव्यवस्थेची  निंतात गरज भासू लागलेली आहे. औद्योगिकरन, नाविन्य पुर्ण संशोधन, वाढती लोकसंख्या, नागरिकीकरण , इ. कारणामुळे सामाजजीवनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे राज्याची फक्त पोलिसी-राज्याची जबाबदारी न राहता जबाबदार कल्याणकारी राज्य बनलेली आहे.

प्रशासन   Administration

        लोकप्रशासनशास्त्राचे स्वरुप जाणुन घेण्यासाठी प्रथम “प्रशासन” ही संकल्पना समजुन घेणे महत्वाचे ठरते . Administration म्हणजे “प्रशासन” होय Ad- ministrare या लॉटिन शब्दापासून Administration या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. या शब्दाचा अर्थ असा की, लोकांची काळजी घेणे, लोकांची सेवा करणे किंवा कार्याची व्यवस्था पाहणे होय. “ प्रशासन ” हा मराठी शब्द प्र + शास् म्हणजे राज्य करणे, सत्ता चालविणे होय. काही राजकीय विचारवंतांनी प्रशासनाची व्याख्या खालील प्रमाणे केलेली आहे.

एल्. डी. व्हाईट : “ एखादा हेतू साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे संचालन संयोजन व नियंत्रण  करणे म्हणजे प्रशासन होय .”

हर्बर्ट सायमन : “ समान उद्देश साध्य करण्यासाठी परस्परांशी सहकार्य करणाऱ्या  विविध समूहांच्या क्रिया-प्रक्रिया म्हणजे प्रशासन होय.”

  वरील विचारवंताची आशय विचारात घेतले असता समान उदिष्टे साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे संघटन, संचालन, संयोजन, व नियंत्रण करणे म्हणजे प्रशासन होय. प्रशासन ही सार्वत्रिक स्वरुपाची प्रक्रिया आहे. मानवी समाज संघटितपणे आपल्या विविध कार्याचे व्यवस्थापन करीत असतो. प्रत्येक कार्यात संघटनात्मक व्यवस्थापन केले जाते. यालाच प्रशासन असे म्हणतात. व्यक्तिगत किंवा सार्वत्रिक असे कोणत्याही स्वरुपाचे कार्य असो, तेथे प्रशासन ही प्रक्रिया आढळते. प्रशासनाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होऊ शकत नाही. प्रशासन या प्रक्रिया संबंध मानवाच्या प्रत्येक कार्याशी असलेल्या दिसुन येतो. मुल जन्माला आल्यापासुन त्याचा संबंध विविध संस्था, कुटुंब, शाखा, मित्रमंडळ, व्यवसाय संघटन, सार्वजनिक संस्था इ. संस्थाची व्यक्तीचा संबंध येतच असतो व त्याल या संस्थे मध्ये विविध प्रकाराची कार्ये पारपाडावी लागतात. या सर्व कार्यात प्रशासनाची प्रक्रिया आढळते प्रत्येक कार्यात संघटन, संचालन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केलेले असते.

प्रशासनाची विविध कार्य. Functions of Administration.

लोकप्रशासनाच्या सदर्भांत “ प्रशासन ” या संकल्पनेचा विचार केला असता असे म्हणता येईल की, लोककल्याणाच्या हेतूने राज्य संस्थेकडून जी कार्ये केली जातात ती कामे प्रशासकीय स्वरुपाची असतात १. वाहतूक व्यवस्था २. टपाल सेवा ३. शिक्षणव्यवस्था ४. आरोग्यसेवा ५.संरक्षणव्यवस्था ६. अर्थव्यवहार ७. बॅका ८. पतपुरवढा अशा विविध गोष्टीसंबंधी सरकारला जी कार्ये करावी लागतात ती कार्ये लोकप्रशासन या सदराखाली मोडतात. शासनाच्या प्रत्येक कार्यात प्रशासकीय यंत्रणा उभारलेली असते. थोडक्यात, राज्यसंस्थेच्या क्रिया, प्रकिया यांचा सामावेश लोकप्रशासनात केला जातो.

“प्रशासन” हा शब्द विविध अर्थानेही वापरला जाते काी लोक सरकार किंवा मंत्रिमंडळ यांना प्रशासन असे म्हणतानां दिसतात. उदा. भारतीय प्रशासन, अमेरिकन प्रशासन. काही वेळा जी व्यक्ती कार्यकारी प्रमुख असते त्यांच्या नावानेही प्रशासनाचा उल्लेख केला जातो. उदा. मोरारजी देसाईचे प्रशासन , नरेंद्र मोदी यांचे प्रशासन सामाजिक व नैतीक दृष्टिकोणातून “प्रशासन” शब्दाला फार मोठी व्यापकता आहे.

प्रशासनातील दृष्टी कोन

  • सर्वव्यापी दृष्टिकोन (The Integral View)

  म्हणजे एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील सर्व घटकांचा आणि त्यांच्या कार्याचा समावेश प्रशासनात करणे होय. उदा. कारखाना, बॅक, सरकारी खाती, मंडळे इ. संघटनातील जे कर्मचारी असतात त्या सर्वांच्या कार्याचा समावेश प्रशासनात केला जातो. प्रशासनाशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांचा आणि क्रिया-प्रक्रियांचा समावेश करणे यास सर्वव्यापी दृष्टिकोण असे म्हणतात.

  • व्यवस्थापनात्मक दृष्टिकोन (The Managerial View)

व्यवस्थान करणे म्हणजे इतरांच्याकडुन कार्य करवूण घेणे होय. संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कार्याचा समावेश न करता केवळ वरिष्ट अधिकारी देखरेख ठेवणे, नियंत्रण करणे , मार्गदर्शन करणे.  अशा प्राकरची व्यवस्थापनाची कार्ये करतात. व्यवस्थापनात्मक दृष्टिकोणात फक्त व्यवस्थापनात्मक कार्याचा समावेश केला जातो. प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या सर्व घटकांचा समावेश केला जात नाही, व्यवस्थापन करणे, प्रशासन चालविणे ही एक कला आहे. प्रशासकीय क्षमतेव्दारे वरिष्टअधिकारी इतर कर्मचाऱ्यांकडून कार्य करवून घेतात. ते संघटनेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून, मार्गदर्शन करुन प्रशासनाचे उद्दिष्ट साध्य करतात. लोकप्रशासन समजुन घेत असतांना आपणास, प्रशासन आणि लोक प्रशासन या दोन घटकांना समजाऊन घेणे क्रमप्राप्त ठरते त्या साठी आधि आपण प्रशासन म्हणजे कायॽ हे समजावून घेऊन त्याची , कार्ये व दृष्टिकोन समजावून घेतले.

!! अरुणभारती !!

6 responses to “लोकप्रशासन Public Administration”

  1. Prashik Mahire Avatar
    Prashik Mahire

    Very nice

  2. Harish vanjari Avatar
    Harish vanjari

    Nice👍

  3. sid Avatar
    sid

    Nice information

  4. Tushar Avatar
    Tushar

    Nice brother 😊👍

  5. Sumit Avatar
    Sumit

    Nice 👍🏻

  6. Harsh Avatar
    Harsh

    Thanks bro

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *