Why did Ambedkar say that 'Democracy will not survive in India?'.
लोकशाही म्हणजे कायॽ अब्राहम लिंकन यांच्या मते “लोकांनी, लोकांच्या हिताकरीता, लोकांवर चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. भारतातील लोकशाही ही संसदीय प्रकार मोडते. त्या बाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५३ साली बीबीसीला दिलेली मुलाखत. “भारतात लोकशाही टिकणार नाही” असे आंबेडकर का म्हणाले ते आपल्यास या मुलाखतीत दिसेलपत्रकार:- डॉ. आंबेडकर , भारतात लोकशाही काम करेल , असे वाटतं काॽ

डॉ. आंबेडकर :- नाही. ती फक्त नावापुरती असेल, म्हणजे लोकशाहीचा लावाजमा, पंचवार्षिक निवडणुका, पंतप्रधान , इ.
पत्रकार:- तुम्हाला निवडणुका महत्तवाच्या वाटतात काॽ
डॉ. आंबेडकर :- नाही. त्या प्रक्रियेतून चांगले लोक तयार होत नसतील, तर निवडणुका महत्त्वाच्या नाहीत.
पत्रकार:- पण सत्ताबदलाच्या दृष्टीने निवडणुका महत्तवाच्या नाहीत काॽ
डॉ. आंबेडकर :- बदल घडवण्यासाठी मतदान करायचं, हा विचार रुजला आहे काॽ लोकांना अजून ती समज आलेली नाही. आपली निवडणुकपध्दती लोकांना उमेदवार निवडण्याचं स्वातंत्रय देते काॽ उदा. कॉग्रेसने बैलाला मत द्या, असं आवाहन केले. आता तो बैल कोणाचं प्रतिनिधित्व करतो, याचां विचार लोक करतात काॽ त्या बैलाच्या चिन्हावर एखादं गाढव उभं आहे की, कोणी सुशिक्षित व्यक्ती, हा विचार कोणीच करत नाही.
पत्रकार:- मी पक्षपध्दतीवर बोलणार नाही, पण तुम्ही “ नावापुरती ” लोकशाही म्हणता, तेव्हा तुम्हाला काय अभिप्रेत आहेॽ
डॉ. आंबेडकर :- इथे संसदीय लोकशाही काम करणार नाही, कारण इथली समाजव्यवस्था तिच्याशी विसंगत आहे.
पत्रकार:- ही व्यवस्था विषमतेवर आधारित आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे काॽ
डॉ. आंबेडकर :- हो, ही व्यवस्था विषमतेवर आधारित आहे. आणि जोवर जातीव्यवस्था ही समाजव्यवस्था बदलत नाही. शांततामय मार्गाने व्यवस्था बदलायला वेळ लागेल, हे मलाही मान्य आहे . पण कोणीतरी त्यासाठी प्रयत्न करायला हवेत नाॽ
पत्रकार:- तुमचे पंतप्रधान तर याबद्दल अनेक भाषणे करतात..

डॉ. आंबेडकर :- ती न संपणारी भाषणं … कार्लाईलने जेव्हा स्पेन्सरला कागदपत्रांचा गठ्ठा दिला, तेव्हा तो काय म्हणाला ‘Oh, this endless speaking Ass in christiandom..’ मला भाषणांचा कंटाळा आलाय…. आता कृती हवी. एखादी योजना. एखादी संस्था, जी ही व्यवस्था बदलु शकेल.
पत्रकार:- याला पर्यायी व्यवस्था काय असु शकतेॽ
डॉ. आंबेडकर :- एखादी साम्यवादी व्यवस्था याला पर्यायं असु शकते.
पत्रकार:- त्याचा देशाला फायदा होऊ शकेल, असं तुम्हाला वाटतंॽ लोकांचे जीवनमान सुधारेल असं वाटतं काॽ
डॉ. आंबेडकर :- होय, सुधारु शकेल. लोकांना निवडणुकांपेक्षा आपल्या मूलभूत गरजांची काळजी जास्त असते. अमेरिकेत लोकशाही काम करत आहे. तिथे साम्यवाद येईल, असं मला वाटत नाही. याचं कारण, प्रत्येक अमेरिकन माणसाचे उत्पन्न खूप जास्त आहे.
पत्रकार:- ते इथे करता येईल, असं नाही का वाटत तुम्हालाॽ
डॉ. आंबेडकर :- कसं करता येईलॽ लोकांकडे पुरेशी जमीन नाही, पाऊस पुरेसा नाही, जंगलतोड प्रचंड आहे. करायचं कायॽ या समस्या जोवर सोडवल्या जात नाहीत… या सरकारला हे प्रश्न सोडवता येतील, असं मला वाटत नाही.
पत्रकार :- या देशातही ॽ
डॉ. आंबेडकर :- हो अर्थात. युध्दात तुम्ही कत्तल करतात, बरोबरॽ तुम्हाला त्याचं दु:ख नाही. स्वत:च्या हितसंबधांच्या रक्षणासाठी ते करणं तुम्हाला गरजेचं वाटतं.
पत्रकार:- ही व्यवस्था कोसळेल, असं तुम्हाला वाटतं काॽ
डॉ. आंबेडकर :- हो, ही व्यवस्था कोसळेल, मी माझ्या लोकांचा विचार करत आहे. ते अत्यंत उतावीळ झाले आहेत. आणि ते समाजातल्या सगळयात खालच्या स्तरात आहेत. जर एखाद्या इमारतीचा पाया कोसळत असेल, तर सगळ्यात आधी सगळ्यात खालचा स्तर कोसळतो.
पत्रकार:- माझ्या लोकांचा, असं म्हणतांना तुम्ही अस्पृश्यांबद्दल बोलत आहेत नाॽ.
डॉ. आंबेडकर :- होय. आणि कम्युनिस्ट काम करत आहेत काॽ नाही! कारण त्यांचा माझ्यावर भरवसा आहे आणि माझा त्यांच्यावर, ते मला विचारत असतात. मला त्यांना काहीतरी उत्तर द्यायला हवं ना!
!! अरुणभारती !!
संदर्भ :-
Leave a Reply