For Building and other incentive classes, social security schemes, educational schemes, health schemes.
राज्यातील बांधकाम कामगारांच्या त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास व त्यांचे जीवनमान सुधारावे या साठी राज्य शासनाने महाराष्ट्र ईमारत बांधकाम कामगारा योजना कल्यान मंडळाची स्थापना केली आहे या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजना राबविल्या जातात राज्यातील बांधकाम कामगारांच्या समस्यांचा विचारक करुन राज्य शासनाने १ मे २०११ रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे या मंडळामार्फत विविध क्षेत्रातील बांधकाम कामगाराची नोंद केली जाते तसेच त्यांना सामाजिक , शैक्षणिक , आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा पुरविल्या जातात व विविध योजनांचा लाभ दिला जातो.

बांधकाम कामगार नोंदणी खालील प्रमाणे करु शकतात.
नोंदणी पात्रता निकष :-
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणुन काम केलेले कामगार
नांदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म- व्ही भरुण खालील प्रमाणे दस्तावेजासह अर्ज सादर करणे.
- वयाचा पुरावा.
- ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
- रहिवासी पुरावा.
- ओळखपत्र पुरावा.
- पासपोर्ट आकाराचे ३ फोटो.


!! अरुणभारती !!
Leave a Reply