Western Political Thinker “Aristotle”
इ. स. पूर्व ३८४ ते इ. स. पूर्व ३२२
ॲरिस्टॉटलचा जन्म ख्रि. पू ३८४ मध्ये मॅसिडोनियन राजयाच्या सरहद्दीजवळ असलेल्या स्टागिरा या गावी झाला. मॅसिडोनयिन राजदरबाराशी त्याच्या कुटुंबीयांचे चांगले संबंध होते. त्याचे वडील प्रसिध्द राजवैद्य म्हणून ओळखले जात. मॅसिडोनियन राजा फिलीप्स यांच्याशी ॲरिस्टॉटलचे चांगले संबंध होते. सर्व प्रकारच्या विद्या आणि कला यांचा जाणता व भोक्ता असल्यामुळे राजा फिलीप्सने आपला पुत्र ॲलेक्झांडर याला शिकवण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक म्हणून त्यांची नंमणूक केली होती. वनस्पतीशास्त्र हा त्याचा विशेष आवडीचा विषय होतो. निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती गोळा करुन त्यांच्यातील समान व विषय गुणवैशिष्ट्यांचे वगीकरण करणे हा त्याचा छंदच होता. त्याने केलेले राज्यांने वर्गीकरण हे त्याच्या वनस्पतीशास्त्रांच्या विश्लेषणात्मक अभ्यासाचे मुळ म्हणता येईल. वयाच्या अठराव्या वर्षी तो प्लेटोच्या अकॅडमीमध्ये दाखल झालेल ॲरिस्टॉटल वयाच्या सदतिसाव्या वर्षी बाहेर पडला आणि त्याने त्याच वर्षी स्वत:ची अकॅडमी स्थापन केली.
प्राचीन भारतात जसे राजे ऋषीमुनींच्या विचारांचा आदर करीत . त्याचप्रमाणे प्लेटो आणि ॲरिस्टॉटल देखील राजाश्रयाने आपले ज्ञानार्जन आणि ज्ञानदानाचे काम करत. ॲरिस्टॉटलला मॅसिडोनियाजवळील हार्मिआस राजाच्या दरबारी आश्रय मिळाला. त्याच्या बुध्दिमत्तेमुळे राजा हार्मिआस इतका प्रसन्न झाला की, त्याने आपल्या पुतणीचे लग्न अॅरिस्टॉटलबरोबर लावून दिले. ॲरिस्टॉटल हा विचारवंत रुढी आणि परंपरांचा आदर करणारा होता. त्याचे व्यक्तिगत जीवन परंपरावादी होते. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यात मोठया प्रमाणात फरक दिसतो प्लेटो हा अविवाहीत होता. त्यामुळे त्याचे विचाराने तो स्वप्नाळु होता. ॲरिस्टॉटल कुटुंबवत्सल असल्यामुळे त्याची वास्तवाशी कधीही फारकत झाली नाही . प्लेटो आणि ॲरिस्टाफटल यांच्या अभ्यासपध्दती भिन्न होत्या. प्लेटोने सॉक्रेटिसबरोबर केलेली भ्रमंती आणि सॉक्रेटिसच्या गुरु शिष्य संवादातून संकलित केलेल्या ज्ञानाच्या आधाराव निगमनात्मक पध्दतीने ऑपल्या अकॅडमीमध्ये बसुन ग्रंथरचना केली. तर ॲरिस्टॉटलने आपला अनुभव आणि निरीक्षणाचा ज्ञानप्राप्तीसाठी उपयोग करुन घेऊन निगमनात्क पध्दतीने विचार मांडले. ख्रिस्तपूर्व ३६५ मध्ये ॲरिस्टॉटल अथेन्स या नगरराज्यात परतला कदाचित अलेक्झांडरच्या भीतीनेच ॲरिस्टॉटल मॅसिडोनयिा सोडून अथेन्सला परतला असावा. अथेन्समध्ये ॲरिस्टॉटलने “लिसियम” Licyum या नावाने ओळखील गेलेली शिक्षणसंस्था स्थापन केली.
ॲरिस्टॉअलची राजकीय ग्रंथसंपदा
पॉलिटिक्स (Politics )
लेखनपध्दती विगमनात्मक (Inductive )आहे

ॲरिस्टॉटलचे राजकीय विचार
ॲरिस्टॉटलची राज्यविषयकय संकल्पना
सामाजिक शास्त्राचे प्रणेते तत्वज्ञ म्हणुन सॉक्रेटिस आणि प्लेटो यांच्याकडे पाहिले जाते. सर्वसाधारणपणे सामाजिक शास्त्र आणि विशेषत: राज्यशास्त्र या विषयाचा पया घालण्याचे श्रेय ॲरिस्टॉटलला दिले जाते. आपले राजकीय विचार ॲरिस्टॉटलने त्याच्या “पॉलिटिक्स” या ग्रंथात मांडले आहेत. “पॉलिटिक्स” या ग्रंथात त्याने राज्याची उत्पत्ती, राज्याचे स्वरुप, राज्याचे घटक, राज्याचे प्रयोजन आणि राज्याचे कार्यक्षेत्र या विषयी तात्विक विवेचन केले. राज्य ही नैसर्गिक संस्था नसून, ती मानवाने बुध्दिपूर्वक निर्माण केली आहे. या निर्मितीचा आधार एकप्रकारे सामाजिक करार या स्वरुपाचा होता. आपल्या सुरक्षा आणि सोयीसाठी मानवाने निर्णय घेऊन राज्याची निर्मिती केली. ॲरिस्टॉटलने आपले राज्य आणि शासनविषयक विचार तीन तत्वांच्या आधाराव मांडले.
१. मनुष्य हा सामाजिक जीव आहे Man is a social animal
२. मनुष्य हा विवेकशील जीव आहे Man is a rational animal
३. मनुष्य हा संघटित होऊन राजकीय जीवन जगणारा जीव ओहे Man is a political animal.
या तीन्ही तत्वांचाी सांगड घातल्यास राज्याची निर्मिती सामाजिक गरजेतून, मानवाच्या विवेकशीलतेच्या आधाराव संघटित राजकीय जीवन जगण्यासाठी झाली असे म्हणता येते. राज्याचा उद्य कसा झाला याचा ॲरिस्टॅटलने मुलभुत विचार केल्याचे आढळते. राज्यच्या उद्याच्या आधुनिक उत्क्रंतीवादी सिंध्दान्ताचा पाया ॲरिस्टॅटलने घातला हे सांगुनही खेर वाटत नसले तरी ते खरे आहे. राज्य ही एक नैसर्गिक संस्था असुन तिची उत्पत्ती उक्रांतीक्रमाने झाली असे ॲरिस्टॉटलला वाटते. प्रथम विवाहसंस्था, मग कुटुंबसंस्था आणि नंतर खेडे व खेड्यांचा समुदाय अशा उत्क्रांतीनुसार संघटित समुहजीवन निर्माण झाले. पुढे कालांतराने अनेक खेड्यांच्या समुदायातून नगरराज्य निर्माण होऊन राज्यांची पूर्णपणे उत्कांती झाली.!! अरुणभारती !!
Leave a Reply