ॲरिस्टॉटल | Aristotle

Western Political Thinker Aristotle

ॲरिस्टॉटल : राज्यशास्त्राचे जनक, जीवन, ग्रंथसंपदा आणि राज्यविषयक विचार

ॲरिस्टॉटल | Aristotle इ. स. पूर्व २८४ तम ३२२ ग्रीन नगरराज्यात राज्यशास्त्र हा विषय शास्त्रीय पद्धतीने मांडणाच्या ॲरिस्टोटला राज्यशास्त्राचे जनक मानले जाते. ॲरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता. तो जवळपास २० वर्षे प्लेटोच्या सानिध्यात राहिला . प्लेटो हा आदर्शवादी स्वप्नाळू होता. तर ॲरिस्टोटल हा वास्तववादी विचारवंत होता.

            ॲरिस्टोटल हा एका राजवैद्याचा मुलगा होता.  ॲरिस्टोटल हा प्लेटोचा दि लॉज या ग्रंथाने प्रभावित झालेला होता प्लेटोने जगविख्यात सिंकदराने जिकण्याची सामाजिक अध:पतन होऊन काळात अथेन्सची सामाजिक ती तळाला गेली होती या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून प्लेटोने आपल्या तत्वज्ञानाची मांडणी आपल्या ग्रंथामधून केलेली दिसते.

Table of Contents

ग्रंथसंपदा :-

            ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, काव्यशास्त्र, वक्तृत्वशास्त्र आणि राजकारण अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे तो प्राचीन ग्रीसमधील सर्वश्रेष्ठ बहुविद्याशाखीय तत्त्वज्ञ मानला जातो.. त्यांच्या प्रचंड बुध्दीमत्तेवर  ४०० ग्रंथाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्यापैकी दि पॉलीटीक्स हा त्याचा प्रसिद्ध असा ग्रंथ आहे.

सर्वात महत्त्वाचे ग्रंथ

  • Politics (राज्यशास्त्र)
  • Nicomachean Ethics (नीतिशास्त्र)
  • Metaphysics (तत्त्वज्ञान)
  • Organon (तर्कशास्त्र)
  • Poetics (काव्यशास्त्र)
  • Rhetoric (वक्तृत्वशास्त्र)
  • Physics (भौतिकशास्त्र)

Aristotle यांनी अनेक विषयांवर ग्रंथ लिहिले. त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत:

ग्रंथाचे नावविषय
Politicsराज्यशास्त्र, शासनव्यवस्था, आदर्श राज्य
Nicomachean Ethicsनीतिशास्त्र, सद्गुण, आनंद (Eudaimonia)
Eudemian Ethicsनीतिशास्त्र
Magna Moraliaनैतिक तत्त्वज्ञान
Metaphysicsतत्त्वज्ञान, अस्तित्व आणि वास्तव
Physicsनैसर्गिक विज्ञान, भौतिक जग
On the Soulमानसशास्त्र, आत्म्याचे स्वरूप
Organonतर्कशास्त्र (तर्कग्रंथांचा संग्रह)
Categoriesतर्कशास्त्र
Prior Analyticsनिगमनात्मक तर्क (Syllogism)
Posterior Analyticsवैज्ञानिक ज्ञान आणि प्रमाण
Topicsवादविवाद आणि तर्क
Sophistical Refutationsकुतर्कांचे विश्लेषण
Rhetoricवक्तृत्वशास्त्र
Poeticsकाव्यशास्त्र, नाटक, साहित्य समीक्षा
Economics (परंपरेने जोडला जाणारा ग्रंथ)अर्थव्यवस्था आणि गृहव्यवस्थापन
History of Animalsप्राणीशास्त्र
Parts of Animalsजीवशास्त्र
Generation of Animalsप्राण्यांची उत्पत्ती आणि प्रजनन

ॲरिस्टॉटलचे राज्यासंबधीचे विचार :-

            ॲरिस्टॉटलने  The Politics या ग्रंथामध्ये राज्याी उत्पत्ती स्वरूप विकास व उद्देश कार्य या संबंधी सविस्तरपणे आपले विचार मांडलेले आहेत.

राज्याचे स्वरूप  The Politics :-

            यात राज्यशास्त्र कायदा नैतिकता तत्वज्ञान यांचे वर्णन केले आहे. या ग्रंथात ८ विभाग आहेत.

१) राज्याचे स्वरुप व गुलामगिरीचे वर्णन आहे.

२) प्लेटोच्या आदर्श राज्यावरील टिका.

३) निरनिराळ्या घटकांचे प्रकार त्याचे स्वरूप त्यांचे नागरित्व व राज्यसंस्थेचे वर्णन त्यात आहे.

४) राज्यसत्ता सोडून इतर प्रकारच्या शासनाचे त्यात वर्णन आहे.

५) यात क्रांतीचे प्रकार त ते दुरकरण्याचे उपाय.

६) आदर्श राज्याचे वर्णन आहे.

७)सिद्धांत आदर्श व संविधान यांचे वर्णन आहे.

ॲरिस्टॉटलवरील प्रभाव :-

१) ॲरिस्टॉटलवर त्याचा गुरु प्लेटोचा प्रभाव होता.

२) अथेन्सच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा प्रभाव हा ॲरिस्टोटलवर होता.

३) मॉसिडोनियाचा राजकुमार सिकंदर त्याच्या सहवासात राहिल्यामुळे त्याचाही प्रभाव पडला.

४) ग्रीकसंस्थांचा देखील त्याच्यावर प्रभाव पडला.

६) ॲरिस्टॉटलच्या सुखी-वैवाहिक जीवनाचा त्याचा राजकीय विचारांवर प्रभाव पडला व त्याच्या कुटुंब संस्थेबद्दल जिवाळा व प्रेम होता.

७) तसेच नक्कम संपत्तीक परिस्थितीचा देखील जिवाळा होता त्यामुळे मालमत्तेचे समर्थन त्याने केले.

ॲरिस्टॉटलचे राज्यासंबधीचे विचार / वैशिष्टये :-

            ॲरिस्टॉटलने राज्याचे स्वरूप विकास संपत्ती उद्देश यांची सुंदर मिमांसा केली त्यामुळे त्याच्या राज्याची पुढील वैशिष्ट्ये महत्तवाची आहे.

१) राज्य नैसर्गिक (स्वभाविक) संस्था आहे :-

            ॲरिस्टॉटलच्या मते शास्त्र राज्यशास्त्र ही स्वभाविक व नैसर्गिक संस्था असून  तिची  उत्पत्ती ही विकासातून झाली आहे. कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे . त्यामुळे तो एकठा राहूचा शकत नाही. तसाच तो राजकीय प्राणी देखील आहे. कारण राज्याचा जन्म हा जीवनासाठी झाला व सुखी जवीनासाठी ते कायम आहेत. राज्य हे मनुष्याची वाढ थांबवली नाही तर त्यास वाढविते ते एखाद्या घरट्यासारखे आहे. पिंजऱ्या प्रमाणे नाही राज्याची उत्पत्ती ही मनुष्याच्या स्वभावातूनच झाली आहे.

२) राज्य हे मानवी शरीरासारखे आहे :-

            ॲरिस्टॉटलच्या मते शरीराचे विभिन्न अवयव जसे एक सुत्रात बांधलेले असतात त्याच प्रमाणे व्यक्ती हा समुदायाचे मुल्य हे राज्याच्या संजीवनीवर अवलंबून असते. राज्याच्या विभिन्न घटकाचं अस्तित्व हे राज्या अवलंबून असते.

FAQ | सतत विचारले जाणारे प्रश्न (Aristotle / ॲरिस्टॉटल)

1. ॲरिस्टॉटल कोण होता?

ॲरिस्टॉटल (इ.स.पूर्व 384–322) हा प्राचीन ग्रीसचा महान तत्त्वज्ञ, राज्यशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक होता. त्याला राज्यशास्त्राचा जनक मानले जाते. तो प्लेटोचा शिष्य आणि सिकंदर महानाचा गुरु होता.

2. ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक का म्हणतात?

ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राचा अभ्यास शास्त्रीय, तर्कशुद्ध आणि अनुभवाधारित पद्धतीने केला. विविध राज्यघटनांचा तुलनात्मक अभ्यास करून त्याने शासनव्यवस्था, राज्य आणि नागरिकत्व यांचे सखोल विश्लेषण केले. त्यामुळे त्याला राज्यशास्त्राचा जनक म्हटले जाते.

3. ॲरिस्टॉटलचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे?

The Politics (पॉलिटिक्स) हा त्याचा सर्वात प्रसिद्ध राजकीय ग्रंथ आहे. या ग्रंथात राज्याची उत्पत्ती, उद्दिष्टे, शासनप्रकार आणि आदर्श राज्यव्यवस्थेचे विवेचन केले आहे.

4. ॲरिस्टॉटलचे प्रमुख ग्रंथ कोणते आहेत?

ॲरिस्टॉटलचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत:

  • Politics
  • Nicomachean Ethics
  • Metaphysics
  • Organon
  • Rhetoric
  • Poetics
  • Physics
  • On the Soul
5. ॲरिस्टॉटल आणि प्लेटो यांच्यातील मुख्य फरक काय होता?

प्लेटो हा आदर्शवादी तत्त्वज्ञ होता, तर ॲरिस्टॉटल वास्तववादी विचारवंत होता. प्लेटोने आदर्श राज्याची संकल्पना मांडली, तर ॲरिस्टॉटलने प्रत्यक्ष राज्यव्यवस्थांचा अभ्यास करून व्यवहार्य राजकीय विचार मांडले.

6. ॲरिस्टॉटलच्या मते राज्य म्हणजे काय?

ॲरिस्टॉटलच्या मते राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे. राज्याचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांना सद्गुणी, सुरक्षित आणि आनंदी जीवन मिळवून देणे हे आहे.

7. ॲरिस्टॉटलच्या मते मनुष्याचे स्वरूप काय आहे?

ॲरिस्टॉटलच्या मते “मनुष्य हा स्वभावतः सामाजिक आणि राजकीय प्राणी आहे.” (Man is by nature a political animal.)

8. ॲरिस्टॉटलने शासनप्रकारांचे वर्गीकरण कसे केले?

त्याने शासनप्रकारांचे दोन गट केले:

  • योग्य शासनप्रकार: राजेशाही (Monarchy), कुलीनशाही (Aristocracy), संविधानिक शासन (Polity)
  • भ्रष्ट शासनप्रकार: अत्याचारशाही (Tyranny), धनिकशाही (Oligarchy), विकृत लोकशाही (Democracy)
9. ॲरिस्टॉटलच्या विचारांचे आधुनिक राज्यशास्त्रात महत्त्व काय आहे?

संविधानवाद, कायद्याचे राज्य, नागरिकत्व, शासनप्रकारांचे वर्गीकरण आणि तुलनात्मक राज्यशास्त्र या संकल्पनांवर ॲरिस्टॉटलच्या विचारांचा आजही मोठा प्रभाव आहे.

10. MPSC आणि UPSC परीक्षांसाठी ॲरिस्टॉटल का महत्त्वाचा आहे?

MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पाश्चात्त्य राजकीय विचारवंत, राज्यशास्त्र, राजकीय तत्त्वज्ञान आणि शासनव्यवस्था या विषयांमध्ये ॲरिस्टॉटलच्या जीवन, ग्रंथ आणि राज्यविषयक विचारांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याचा सखोल अभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.