Dubhakisk Mumbai Rajya In Marathi | द्वैभाषिक मुंबई राज्य

द्वैभाषिक मुंबई राज्य

 Dubhakisk Mumbai Rajya In Marathi Bilingual Mumbai State
            Dubhakisk Mumbai Rajya In Marathi सर्व मराठी भाषिक प्रदेश आणि जनतेचे एकत्रीकरण करुन त्यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करावे अशी मराठी भाषिकांची मागणी होती. ती समजावूण घेण्यासाठी स्वांतत्र्यपूर्वकाळातील काही घटनांचा परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी भारताची ११ प्रांतता विभागणी केली होती ब्रिटिशांनी प्रांत रचना करतांना भौगोलिक स्थिती, भाषा व सांस्कृतिक घटक या पैकी कोणताही एक घटक आधार न मानता कोणताही निश्चित तर्क वा समानसुत्राचा वापर न करता आपले प्रशासन योग्य पध्दतीने कसे चालविता येईल हे पाहिले होते. पण स्वातंत्र्योत्तर भारतात समान भाषा, भौगोलिक संलग्नता विचारात घेऊन राज्याची रचना करणे अपेक्षित होते मात्र केंद्र शासनाने भारताची फाळणी व संस्थानांच्या विलिनिकरणाच्या प्रश्नाने निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करीत असतांना ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या प्रांतात शक्य तेथे अल्पसा बदल करुन स्वतंत्र भारतात आहे ती प्रांत रचना कायम ठेवून राज्ये निर्माण केली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसने आपल्या १९२१ च्या अहमदाबाद येथील अधिवेशनात भाषिक प्रदेश निर्माण होणे आवश्यक आहे असा ठराव संमत केला असला तरी प्रत्येक्षात स्वातंत्र्यानंतर तोच कॉग्रेसपक्ष व सरकार भाषिक राज्यरचनेला विरोध करीत होता. १३ मे १९४६ रोजी बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट परिषदेच्या स्थापनेपासून विशेष  आकारास येऊ लागलि होती. त्याच बरोबर केंद्र शासनाने भाषिक राज्याच्या मागणीचा अभ्यास करुन शिफारशी करण्यासाठी २९ डिसेंबर १९५३ रोजी “ राज्य पुनर्रचना आयोग स्थापन” केला. न्यायमुर्ती एस. फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपुनर्रचना आयोग स्थापन केला. फजल अली आयोगाने १० ऑक्टोंबर १९५५ राजी आपला अहवाल प्रसिध्द केला. त्यांच्या अहवालाती काही महत्वाच्या तरतुदी खालील प्रमाणे.
  1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य सुचवून संपूर्ण गुजराती प्रदेशासह मराठवाडा धरुन मुंबईचे द्वैभाषिक राज्य निर्माण करण्यात येईल. मुंबई राज्यातून बेळगांव , कॅनरा, धारवाड, विजापूर हे जिल्हे वगळण्यात येऊन ते म्हैसूर राज्यात समाविष्ट केले जातील.
  2. देशातील घटक राज्यांची भाषिक तत्वांवर पुनर्रचना करण्यात येईल परंतू अपवाद म्हणून द्वैभाषिक मुंबई राज्याचा आणि एकाच भाषिकांची हैद्रबाद व आंध्र प्रदेश अशी दोन स्वतंत्र्य घटक राज्ये स्थापन करण्याचा असेल.
  3. विदर्भाचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात येईल .
           Dubhakisk Mumbai Rajya In Marathi फजल अली कमिशनने संपूर्ण भारतात एक भाषिक राज्याची शिफारस केली होती. मात्र त्याला महाराष्ट्राचा अपवाद करुन मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात आलेला होता. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाठ उसळली होती. कॉग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी या शिफारशीचा तीव्र शब्दात निषेद नोंदविला. कॉग्रेस कार्यकारणीने विरोधाची तीव्रता कमी  करण्यासाठी ९ नोव्हेंबर १९५५ रोजी “त्रिराज्य सुत्र” सुचविले. त्यानुसार सर्व मराठी भाषिक प्रदेशाचे महाराष्ट्र, सर्व गुजराती भाषिक प्रदेशाचा समावेश असलेले गुजरात आणि संमिश्र भाषिक मुंबई महानगर अशी तीन राज्ये स्थापन करण्याचा नवा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाने मराठी भाषिकांवर जानूनबूजून अन्याय करण्यात येत आहे अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली. त्याच बरोबर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १६ जानेवारी १९५६ रोजी मुंबई शहर केंद्रशासित करित असलयाची घोषणा केली. त्याची संतप्त अशी प्रतिक्रिया मुंबई शहरात मोठया प्रमाणात दंबली झाल्यात. या सर्वांचा परिपाक म्हणुन केंद्राने द्वैभाषिक मुंबई राज्याचा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्र कॉग्रेसच्या नेत्यांनी सध्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना शक्य नसल्याचे पाहुन मराठी व गुजराती भाषिक प्रदेशाचे द्वैभाषिक राजया स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वीकारला. द्वैभाषिकाच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र येऊन मुंबई शहर महरारष्ट्रापासून हिरवले जाणार नाही. त्याचप्रमाणे प्रथमच विदर्भ, मराठवाडा हे मराठी भाषिक प्रदेश कॉग्रेस नेतृत्वाने पक्षश्रेष्ठीचा द्वैभाषिकाचा निर्णय मान्य केला. संसदेने २४ जुलै १९५६ रोजी मुंबई मराठी, गुजराती प्रदेशाचा समाविश असलेले द्वैभाषिक मुंबई राज्य स्थापनेचे विधेयक मंजुर केले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले द्वैभाषिक मुंबई  राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण या मराठी भाषिक नेत्याल नियुक्त करुण असंतोष शांत करण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केलेला आपणास दिसतो. द्वैभाषिक  मुंबई राज्य महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातलाही मान्य नव्हते. मात्र मराठी व गुजराती भाषिकांनी तात्पुरती  तडजोड म्हणून त्याचा स्वीकार केलेला होता. खरा मुद्दा मुंबईवाचून संयुक्त महाराष्ट्र की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र असा होता. गुजरातचा व्यापार उद्योग मुंबईशी जोडलेला असल्याने गुजरातला मुंबईपासुन वेगळे शासन नको होते. थोडक्यात सांगायचे द्वैभाषिक राज्यांने कोणीही खुष नव्हते. द्वैभाषिक मुंबई राज्य चालविण्याची जबाबदारी मा. यशवंतराव चव्हाण यांच्यावर पडली होती. हे राज्य चालविणे अतिशय कठीण व जिकीरीचे काम होते. यशवंतरावांना राज्यसांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मुत्यद्दीपणा व संयम यांच्या सुयोग्य समन्वय साधून चव्हाण यांनी राज्याचा गाडा हाकलला. या सर्वांचा विचार केला असता १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तीत्वात आले.

!! अरुणभारती !!

3 responses to “Dubhakisk Mumbai Rajya In Marathi | द्वैभाषिक मुंबई राज्य”

  1. Sid Avatar
    Sid

    Nice information

  2. […] https://akkiblog.in/?p=123 ३. द्वैभाषिक  मुंबई राज्य https://akkiblog.in/?p=118 ) त्याचवेळी मराठवाडा , विदर्भ, गोमंतक […]

  3. sonu bachchav Avatar
    sonu bachchav

    nice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *