Development of the study of International Relations.
आंतरराष्ट्रीय संबंध हा अभ्यासाचा नवीन स्वतंत्र विषय आहे. प्राचीन ग्रीक व रोमन काळातील आंतरराष्ट्रीय संबंधाहून या विषयाचे स्वरुप वेगळे आहे. प्राचीन काळातील संबंध हे मुख्यत्वेकरुन राजकीय स्वरुपाचे होते. परंतू आज राज्यांचे परस्परांत राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक असे विभिन्न संबंध प्रस्थापित झालेले आहेत. आज विज्ञान युगात दळवळणांच्या व तंत्रज्ञानांच्या साधनांमध्ये प्रचंड प्रगतीमुळे राज्यांराज्यांतील अंतर कमी झाले आहे. आज राष्ट्रांच्या गरजा वाढल्यामुळे राज्यांराज्यांना ऐकमेकावर अवलंबून राहावे लागते. प्रचीन काळातील राज्ये स्वावलंबी होती परंतू आज ती परस्परावलंबी बनली आहेत. राज्यांचे हे संबंध दोन प्रकारचे असु शकतात १. मित्रत्वाचे : मित्रत्वाचे संबंधात परस्पर सहकार्य व मदतीची भावना असते. या संबंधाना गैरराजकीय संबंध (Non-Political Relations) २. शत्रुत्वाचे : राज्यांचे संबंध अनेक वेळा बिघडतात. त्यांच्यात संघर्ष किंवा युध्दस्थिती निर्माण होते. अशा वेळी त्यांच्यात शत्रुत्वाचे संबंध निर्माण होतात. अशा संबंधांना शक्तीसंबंध (Power Relations) असे म्हणतात.
आंतरराष्ट्रीय समाजातील या सार्वभौम राज्यांमध्ये त्यांच्या हितसंबंधाबाबत साम्या आढळत नाही. या विभिन्न राष्ट्रांच्या हितसंबंधानाच त्यांचे राष्ट्रीय हित (National Interest) असे म्हणतात. (उदा. आपल्या वर्गातील वर्ग मिंत्राण सोबत असलेले संबंधाचा जो परिपाक असतो तसाच राज्यांराज्यामध्ये असतो.) प्रत्येक राज्य आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असते ही उद्दिष्टे सत्तेव्दारे प्राप्त करतात. प्रत्येक राष्ट्राची शक्ती किंवा सत्ता ही राज्याची उत्तम भौगोलिक स्थिती, मर्यादित लोकसंख्या , तंत्रज्ञानातील प्रगती, मनोबल व प्रभावी नेतृत्व ही राष्ट्रशक्तीच्या साधनांवर अवलंबून असते.
आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या
Definitions of International Relations
राष्टीहित साध्य करण्यासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असते. हा प्रयत्न परराष्ट्र धोरणांव्दारे केला जाते. म्हणूनच फेलिक्स ग्रास यांनी “आंतरराष्ट्री संबंधाच्या अभ्यास परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाशी तंतोतंत जुळणारा आहे”, असे मत व्यक्त केले आहे. मॉर्गेन्थो : “आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राष्ट्रांराष्ट्रामधील संघर्ष व सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न होय.” पामर व परकिन्स “ आंतरराष्ट्री राजकारणाच्या अभ्यासाचा संबंध मुख्यत्वेकरुन राज्यपध्दतीशी असतो. नार्मन पेडर्ल्फोर्ड व जॉर्ज लिंकन : “ आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे राज्याच्या धोरणातील परिवर्तनशील सत्तासंबंधाच्या पध्दतीमध्ये घडुन येणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया होत”.
“आंतरराष्ट्रीय राजकारण ही जगातील प्रमुख गटावर आपलया कुटिल व्युव्हरचनेचा उपयोग करुन प्रभाव पाडून किंवा त्यांच्यावर आपले निंयत्रण प्रस्थापित व्हावे या साठी कोणाच्या विरोधाची प्रसंगी पर्वा न करता आपले उद्दिष्ट सफल करायला उद्दुक्त होणारी कला होय”. आंतररारष्ट्रीय संबंधाची व आंतरराष्ट्रीय राजाकणाची या दोघांची पध्दतींचा विचार केले असता, आंतरराष्ट्रीय संबंधाची अभ्यासपध्दती वर्णनात्मक असते तर आंतरराष्ट्रीय राजकारणाची अभ्यासपध्दती प्रामुख्याने विश्लेषणात्मक असते. आंतरराष्ट्रीय संबंधात सत्यघटनांच्या क्रमबध्दपध्दतीने अभ्यास केला जातो. परंतम आंतरराष्ट्रीय राजकारणात एखाद्या वर्तमानकालीन घटनेचे भूतकालीन संदर्भ व भविष्यकालीन परिणामाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले जाते. तेव्हा आपणास वरीलप्रमाणे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा विकास समजुन घेता येतो.
!! अरुणभारती !!
Leave a Reply