Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25 |महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना २०२४-२५

Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25

      Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25 राज्य मंत्रिमंडळाने १० ऑक्टोबर २०२३ रोजी मुलींच्या सक्षमीकरणासाठीच्या “ लेक लाडकी ” योजनेला मंजुरी दिली . या सोबत “ माझी कन्या भाग्यश्री ” यांजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आले. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलीला “ १,०१,००० रु ”  देण्याची ही कल्याणकारी योजना आहे. या योजनेत मुलगी जन्मलापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत गरीब कुटुंबाला हप्त्यानं पैसे दिले जाणार आहेत.


मुलीचे वयमिळणारी रक्कम
मुलीच्या जन्मावर५,०००/-
पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी६,०००/-
सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी७,०००/-
अकरावीत प्रसेश घेण्यासाठी८,०००/-
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर७५,०००/-
एकुण प्राप्त रक्कम१,०१,०००/-

योजनेचे उद्दिष्टे :-

  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
  • मुलींच्या शिक्षणास चालणा देणे.
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे.
  • बालविवाहाचे प्रमाण कमी करणे.
  • कुपोषण कमी करणे.
  • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.

लाभार्थी / या योजनेचा लाभ कोणा कोणास घेता येईल.

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • पिवळया व केशरी शिधापपिकाधारक कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या किंवा दोन मुलींसाठीर ही योजना लागु आहे.
  • १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही लाभ मिळेल.

आवश्यक कागदपत्रके :-

  • महाराष्ट्र रहिवाशी साठी पत्याचा पुरवा
  • पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका.
  • लाभार्थिंचे आधार कार्ड.
  • लाभार्थिंच्या आई चे आधार कार्ड.
  • लाभार्थिंचा जन्माचा दाखला.
  • उत्पन्न दाखला  (एक लाख पेक्षा कमी)
  • कुटुंबनियोजन प्रमाणपत्र.
  • शाळेचे बोनाफाईट प्रमाणपत्र.
  • पाचव्या हप्ता घेतांना अविवाहित असल्याबाबत लाभार्थिंचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र.
  • बॅुंकेच्या पासबुकची झेरॉक्स.
  • मतदान ओळखपत्र ( शेवटच्या लाभाकरीता १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)

!! अरुणभारती !!

6 responses to “Maharashtra Government Lek Ladki Yojana 2024-25 |महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना २०२४-२५”

  1. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice 👍🤗

  2. Siddhesh Avatar
    Siddhesh

    Thank you

  3. Tejaswini Lalage Avatar
    Tejaswini Lalage

    Great

  4. Ratanlal Sonawane Avatar
    Ratanlal Sonawane

    Very Nice Akki

  5. Mahendrasingh chandel Avatar
    Mahendrasingh chandel

    Nice information 👍

  6. Tushar Avatar
    Tushar

    Very nice Akki 👍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *