प्रस्तावणा
नक्षलवादी हा शब्द प्रयोग सध्याच्या काळात भारताच्या राजकारणात सर्रास वापरला जातो. पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील नक्षलबारी येथे १९६७ मध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये त्या शब्दांच मूळ आहे. डाव्या कम्यूनिष्ट (माकप) पक्षातील कम्यूनिस्टांनी शेतकऱ्याचे लऐ अभारले होते. त्यामुळे या भागतल्या भूमिहिन शेतमजुरांच संघटन तर झाल होतेच , पण जागृतीही निर्माण झाली होती.

१९६६ – १९६७ मध्ये जहाल कम्यूनिस्टांनी हजारो शेतमजुरांची आपल्या क्रांतिकार्यात भरती केली. मार्च १९६७ नंतरच्या काही आठवड्यांमध्ये त्या भागातील जमिनदारांवर हल्ले करुन जमीनविषयक कागदपत्र नष्ट करणे, जमिन दारांना पळवून लावणे, प्रत्यक्ष जमीनिंचा ताबा घेणे, उभी पिक नष्ट करणं इ. मार्गांनी कम्यूनिस्ट कार्यकत्यांनी ह्या भागावर आपले नियंत्रण अचानक प्रस्थापित केलं. सरकार व स्थानिक पोलिस यंत्रणा या सामुहि कृतीपुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले.
कलकत्यात कम्यूनिस्टांच्या एका गटाने या उठावाला पाठिंबा दिला आणि पोलीसी कार्यवाहीला विरोध केला. त्याच आणि चिनी कम्यूनिस्ट पक्षाच्या दृष्टीने जनतेच्या सशस्त्र क्रांतिकारक संघर्षाचं हे पहिले पाऊल होत.
दारिद्र्य, सामाजिक विषमता, सरकारी अनास्था यांच्या बरोबरच कम्यूनिष्टांचा वैचारिक प्रभाव आणि संघटन यांच्या मुळे सामान्य शेतीकरी अशा थेट कृतीला उद्युक्त झाला. जनतेच्या कष्टकरी वर्गांच्या संघटित थेट कृतीव्दारे प्रस्थापित वर्गांच्या ताकदीला अव्हान देण्याचा हा मार्गपुढे “नक्षलवादी” मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला.
!! अरूणभारती !!
संदर्भ :-