आधुनिक स्पर्धात्मक राजकारण आणि बदलती मुल्ये. | Aadhunik Pradhatamak Rajkaran Aani Badalti Mulye

आधुनिक स्पर्धात्मक राजकारण आणि बदलती मुल्ये.

 

     आधुनिक राजकारण हे विचारधारेवर आधारीत न राहता ते संपूर्ण  “सत्ताकेंद्रीत” झाल्याचे दिसते. सर्व पक्षाचे सत्तेसाठी निवडणुक जिंकणे हे एकच उद्दिष्ट असल्याने राजकारणातील स्पर्धा टोकाला पोहचलेली  आहे. या सर्व प्रक्रियेत लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जाणारे राजकीय पक्ष , निष्ठा, आणि विरेधी पक्षाची भूमिका यात अमुलाग्र बदल झालेला दिसताे.

आधूनिक राजकारणात सर्वेाच्च नेत्यावर पक्षाचे अवलंबित्व:-

     आधूनिक राजकारणात सर्वेाच्च नेत्यावर पक्षाचे अवलंबित्व ,सर्वच राजकीय पक्षांत “व्यक्तीपूजा” वाढलेली आपणास दिसुन येते. पक्ष संघटनेपेक्षा आधुनिक राजकारणात सर्वोच्च नेता माठा झाला आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण पाहावयास मिळत आहे. पक्षात लोकशाही पध्दतीने निर्णय घेण्याऐवजी एकाच नेत्याच्या मनमर्जीनुसार सर्व पक्षाचा कारभारचालताना आपणास दिसुन येतो. आधुनिक राजाकारणात ब्रँडिंग आण‍ि मार्केटिंग मोठा प्रभावी मुद्दा बनला आहे. निवडणुका आता पक्षाच्या नावावर , विचारधारेव, विकासावर न राहता, तर व्यक्तीच्या  “चेहऱ्या” वा लढवल्या जातात.

आधुनिक राजकारणात निष्ठा आणि वैयक्तिक ओढ:-

     आधुनिक राजकारणात निष्ठा आणि वैयक्तिक ओढ काळानुरुप बदलेली दिसत आहे. मागील काी वर्षा पासुन आधुनिक राजकारणात “निष्ठा” या शब्दाची व्याख्या बदलेली दिसत आहे. या मुळे पक्षांतराची लाठ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याचा  उपयोग वैयक्तिक सत्ता मिळवण्यासाठी किंवा कायदेशीर कचाट्यातुन सुटण्यासाठी नेते आपल्या मुळ पक्षाशी एकनिष्ट न राहतांना दिसत आहेत. या मुळे आपणास आधुनिक राजकारणात नैतिकतेचा अंत झालेला दिसुन येतो. “ज्या नेत्यासोबत मागील २० ते २५ वर्षे काम केले, त्यालाच सोडून जाणे” ही बाब सर्वच पक्षात सामान्य झालेली आपणासस दिसुन येते. कार्यकत्यांची निष्ठा  हि विचारधारेपक्षा व्यक्तीशी जास्त जोडलेली दिसुन येते. या सर्वात मतदारांचा भ्रमनिरास झालेला दिसतो. ज्या विचारधारेला मतदान करतो, तो नेता निवडणुकीनंतर पूर्णपणे विरुध विचारधारेच्या गटात सामील झालेला दिसुन येतो. यामुळे “वैयक्तिक ओढ” ही केवळ सत्तेपुरती मर्यादित राहिलेली आपणास दिसते.

आधुनिक राजकारणात मुल्यांचा ऱ्हास :-

     आधुनिक राजकारणात मुल्यांचा ऱ्हास झालेला दिसुन येतो. राजाकरणात पूर्वी काही अलिखित नियमन आणि मुल्ये जपली जात होती मात्र, आजच्या आधुनिक राजकारणात स्पर्धा वाढल्याने सत्ताकेंद्रीत राजाकरणात मुल्यांचा ऱ्हास झालेला दिसुन येतो. आधुनिक राजकारणात फोडाफोडीचे राजकारणाला महत्व मिळाले आहे. दुसऱ्याचा पक्ष फोडणे  हे आता मुत्सद्दीपणाचे लक्षण मानले जाते. सत्तेसाठी तडजोड परस्पर विरोधी विचारधारेतल, वैचारिक विरोधक सत्तेसाठी एकत्र येतात. यामुळे सर्वसामान्य माणसाला “मुल्ये” हा प्रकार राजकारणातून हद्दपार झालेली दिसतात.आधुनिक राजकारणात भाषीक पातळी ढासळलेली दिसते. राजकी भाषेत आलेला खालचा स्तर आणि एकमेकांवर होणारे वैयक्तिक हल्ले हे मुल्यांचा ऱ्हासाचे जिवंत उदाहरण जनसामान्यसा पाहावयास मिळत आहे.

आधुनिक राजकारणात सक्षम विरोधी पक्ष :-

     आधुनिक राजकारणात सक्षम विरोधी पक्ष पाहावयास मिळत नाही. ऐकेकाळी सक्षम विरेधी पक्ष हो लोकशाहीचा “आत्मा” समजला जायचा पण सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे.  साम , दाम, दंड, भेद याचा वापर करुन सत्ताधारी पक्ष कुढे तरी मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षाला कमकुवत करतांना दिसत आहे. विखुरलेला विरोधी पक्ष , एकजुटीचा अभावामुळे तो सत्ताधारी पक्षा समोर प्रबळ आव्हाने उभे करु शकत नसल्याने  सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीप्रमाणे मनमर्जी प्रमाणे कारभार करतांना आज आपल्या समोर चित्र पाहता आहोत.                       

     आधुनिक राजकारणात सत्ताकेंद्रबिंदू म्हणून सर्वत्र आहे.  निष्ठा, वैयक्तिक ओढ या सर्व गोष्टी आपणास केंद्रीय राजकारणापासून ते राज्यांच्या राजकारणात दिसुन येत आहेत. मतदाता म्हणुन आपला केलेला भ्रमनिरास या ठिकाणी कळतो.

 

!!अरुणभारती!!

 

संदर्भ ग्रंथ :-

 १ . पळशीकर सुहास. अजित पवारांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चित आणि अनपेक्षित होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *