Prabhutvashali Jatiche Rajkaran | प्रभुत्वशाली जातीचे राजकारण

प्रभुत्वशाली जातीचे राजकारण

            स्थानिक पातळीवर एखादी जात संख्यात्मक ताकद संभाळुन असते तिच्याकडे जमीन जुमला असतो आणि आपल्या आर्थिक शक्तीला साजेशी प्रतिष्ठाही त्या जातीने कमावलेली असते तिला वर्चस्वशाली जात अस नाव प्रसिध्द समाजशास्त्रज्ञ “एम. एन. श्रीनिवास” यांनी दिले. अशा वर्चस्वशाली जातीकडे सत्तेची सुत्रे येथे स्वभाविक होत. पण १९५० नंतरच्या राजकारणात आणखी दोन गोष्टी घडवून आल्या.

१. स्थानिक वर्चस्वशाली जाती :-

            स्थानिक परिसराच्य बाहेरही राजकारणात हात पाय पसरण्यासाठी चाचपणी करु लागल्या. त्यांची स्थानिक सत्ता आणि साधनसामग्री हे आधार त्यांना राजकारणासाठी उपयोगी पडॅ लागले शिवाय जाती समाजात प्रतिष्ठेच विरुध्द असल्यामुळे सत्तेसाठी दावा करणे त्यांना शक्य झाल.

२. मर्यादित संख्याबळ :-

            मर्यादित संख्याबळ असुनही स्वत:कडे नेतृत्व घेऊ शकणाऱ्या काही प्रबळ जातींचा या काळात उद्य होऊ लागला. महाराष्ट्रात अनेक भागात संख्याबळ असलेल्या मराठा जातीकडे साधन सामग्री एकवटल्यामुळे ही प्रबळ जात बनणे सोप होत. पण अनेक राज्यामध्ये एवढ संख्याबळ नसतांनाही काही जाती राज्याच्या राजाकरणात सुत्रधार बनल्या त्यांच्या कडच्या साधन सामुग्रीमुळे हे शक्य झाल. लिंगायत, रेड्डी या संख्येने मोठ्या खऱ्या पण यांच्या राजकीय वर्चस्वाचा मुख्य आधार ग्रामिण अर्थव्यवस्थेची त्यांची ताकदीच होत.

Prabhutvashali Jatiche Rajkaran

३. स्वातंत्र्यपुर्व कॉग्रेस काळात चळवळीला :-

            स्वातंत्र्यपुर्व कॉग्रेस काळात चळवळीला ताकद मिळण्यासाठी कॉग्रेसने मोठे समुह आपल्यामागे उभे केले त्यात वर्चस्व जातीचा समावेश होताच स्वातंत्रय मिळल्या नंतर या जातीचे स्थानिक नेते प्रादेशिक सत्तेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करु लागले त्यातुन स्थानिक व प्रादेशीक राजकारणाच स्वरुप बदलु लागले. ज्या राज्यात भाषावार प्रांतरचनेसाठी मोठ्या चळवळी झाल्या तिचे वर्चस्वशाली जातीकडे राजकारण्याची सुत्रे गेली. यात “महाराष्ट्रात मराठा”, “पंजाबमध्ये चर्मकार”, आणि मजहवी  हे दलित जाती, उत्तरप्रदेशात जाट, हे शेतकरी जाती, तमिहनाडुमध्ये वळीयार अशा प्रकारच्या जातीच्या लोकांची संख्या बहुसंख्यात्मक आहे. आणि यांच्या या संख्येमुळे साधन संपत्तीमुळे या जाती वर्चस्वशाली बनल्या आहेत.

४. नेहरुंचा लोकशाही रुजवण्याच्या दृष्टिकोन :-         

            नेहरुंचा लोकशाही रुजवण्याच्या दृष्टिकोनामुळे तसेच त्यांच्या नेतृत्वामुळे सुरुवातीच्या काळात या वर्चस्वशाली जातीच नेतृत्व कॉग्रेस मध्ये होत मात्र इंदिरा गांधीजींनी स्थानिक नेतृत्वाच्या खच्चीकरणाचे जे धोरण अवलंबले त्यामुळे बरेच नेते कॉग्रेस पासुन बाजुला होऊन त्यांनी आपली चुल वेगळी मांडली  उत्तर प्रदेशामध्ये चरणसिंग सारखे नेतुत्व या काळात उद्याला आले. फुत्यांना त्यांच्या ह्यातीत आणि नंतर जो विरोध झाला त्यांचेही कारण हेच की, उच्च जातींनी आपल्या सत्तेला होणारा विरोध ओळखला होता आणि म्हणुन फुल्यांचा युक्तिवाद व त्यांचे राजकारण यांना समाजमान्यता मिळु नये असा प्रयत्न चालवला होता. महाराष्ट्रातील ब्राम्हणेत्तर चळवळ काय किंवा दक्षिणेत झालेली ब्राम्हण विरोधी चळवळ काय, या देान्ही चळवळी म्हणजे उच्च ( मुख्यत: ब्राम्हण) जातींच्या विरोधातल्या संघटित राजकारणाचीच उदाहरण होती.

FAQ

1. प्रभुत्वशाली जात म्हणजे काय?
ज्या जातीकडे स्थानिक पातळीवर संख्याबळ, जमीन, आर्थिक संसाधने आणि सामाजिक प्रतिष्ठा असते, तिला समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवास यांनी “प्रभुत्वशाली जात” (Dominant Caste) असे संबोधले.

2. प्रभुत्वशाली जातीची संकल्पना कोणी मांडली?
समाजशास्त्रज्ञ एम. एन. श्रीनिवास यांनी ही संकल्पना मांडली.

3. प्रभुत्वशाली जातींची प्रमुख उदाहरणे कोणती?
महाराष्ट्रातील मराठा, उत्तर प्रदेशातील जाट, कर्नाटकातील लिंगायत आणि आंध्र प्रदेशातील रेड्डी या जाती प्रभुत्वशाली जातींची प्रमुख उदाहरणे मानली जातात.

4. प्रभुत्वशाली जातींचा भारतीय राजकारणावर काय प्रभाव आहे?
स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि संसदेतील प्रतिनिधित्व, तसेच प्रादेशिक पक्षांच्या राजकारणात या जातींचा महत्त्वपूर्ण प्रभाव दिसून येतो.

5. MPSC/NET-SET परीक्षांसाठी हा विषय महत्त्वाचा का आहे?
प्रभुत्वशाली जातीचे राजकारण हा भारतीय राजकारण आणि समाजशास्त्रातील मूलभूत विषय असून MPSC, UPSC, NET/SET आणि विद्यापीठीय परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो.

!! अरुणभारती !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *