LMV3
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) चंद्रयान मोहिमेची तारीख निश्चित झाली असून १४ जुलै रोजी २.३५ वाजता एलव्ही एम ३ (Launch Vehicle Mark-III or LVM3) या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. २३ किंवा २४ तारखेला चंद्राच्या

भूभागावर उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्त्रो ने गुरूवारी जाहीर केले. चंद्रयान २ मोहिमेतील अपयशातून धडा घेत चंद्रयान २ मध्ये लँडरच्या पायांची क्षमता २ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याची होती. त्यामुळे चंद्राच्याभूभागावर उतरताना हे वाहन टिकू शकले नाही आणि “रोव्हर” ही चालू शकला नाही. चंद्रयान 3 मध्ये लँडरच्या पायांची क्षमता ३ मीटर प्रतिसेकंद वेग सहन करण्याइतकी वाढविण्यात आली आहे. चंद्राची आवरणशिला, भूगर्भातील हालचाली , पृष्टभागावरील प्लाझ्माचे प्रमाण तसेच लँडिग स्थळाच्या आजूबाजूचे चंद्राच्याभूभागावर रासायनिक मूलद्रव्ये यांचा आभ्यास केला जाणार आहे.
मागिल २० वर्षांत चंद्रयान मोहिमेचे यशाचे ठळक मुद्दे
भारताने २००३ मध्ये चंद्रयान ही संकल्पना तयार केली. त्यानंतर १५ ऑगस्ट २००३ मध्ये तत्कालीन मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी औपचारिकपणे देशाच्या चंद्रमोहिमेची घोषणा केली. २२ ऑक्टोबर २००८ रोजी “इस्त्रो” ने पीएसएलव्ही -सी ११ प्रक्षेपकाच्या सहाय्याने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन “चंद्रयान -१” चे यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही-सी ११ ही पीएसएलव्हीच्या मानक कॉन्फिगरेशची अद्दायावत आवृत्ती होती. लिप्ट-ऑफच्या वेळी ३२० टन वजनाच्या वाहनाने उच्च पेलोड क्षमता प्राप्त करण्यासाठी मोठ्या स्ट्रॅप-ऑन मोटरचा वापर केला. तिरुवनंतपूरम येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे पीएसएलव्ही -११ तयार करण्यात आले होते. पहिल्या चंद्रयानात भारत, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरिया येथे तायार केलेली ११ वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यात आली. तमिळनाडूतील शास्त्रज्ञ मायिलसामी अन्नदुराई यांनी “चंद्रयान-१”चे मोहिमेचे नंतृत्व केले. चंद्रयान रासायनिक, खनिज आणि फोटो जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्रच्या पृष्टभागापासून हे यान चंद्राच्या भूभागापासून १०० किमी उंचीवर चंद्रभोवती फिरत होते. मोहिमेने सर्व इच्छित उदिष्टे साध्य केली असताना प्रक्षेपणानंतर काही महिन्यांनी मे २००९ मध्ये अवकाशयानाची कक्षा २०० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली. चंद्रयान -१ ने चंद्रभोवती ३,४०० पेक्षा जास्त प्रदक्षिणा केल्या. २९ ऑगस्ट २००९ रोजी इस्त्रोच्या शास्त्राज्ञांनी या अंतराळ यानाचा संपर्क तुटल्याचे घोषित केल्यामुळे या मोहिमेचा शेवट झाला.
!! अरुणभारती !!
Leave a Reply