Aditya-L1 Mission
सौर अभ्यासाठी भारताची पहिली मोहिम.
भारतीय अवकाश संशोधने संस्थेंची (इस्त्रो) पहिली सौरमोहीम शनिवारी सुरु होणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी “आदित्य एल १” या यानाचे प्रक्षेपण शनिवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ठिक ११.५० वाजता होणार असल्याचे इस्त्रोने सोमवारी जाहीर केले.

मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे.
१.सुर्याच्या बाह्यपृष्ठाचे तापमान आणि सौरवादळांची स्थिती अभ्यासणे.
२.सुर्यावरील वातावरणाचा तुलनात्मक अभ्यास.
३.सौरवाऱ्यांची दिशा, तापमानातील फरक अभ्यासणे.
४.सौरवादळांचा पृथ्वीवर होणारा परिणाम.
५.सुमारे १२५ दिवसांत १.५ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आदित्य -१ यान सूर्याच्या सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या
“लँगेृजिअन पाँईट – एल-१” च्या हेलो कक्षेत पोहोचेल आणि सूर्याची चित्र पाढवेल.
६.पृथ्वीचे वातावरण आणि गुरूत्वीय क्षेत्र हे एक संरक्षक कवच आहे. ते सूर्याच्या घातक ऊर्जाकणांना आणि विकिरणांना रोखण्याचे काम
करते. सूर्याच्या किरणोत्सर्गाचा शोध घेण्याच्या दृष्टीने ही मोहिम महत्वाची आहे.
७.सूर्याची प्रभामंडलाचे तापमान (कोरोनल हीटींग) सौर वाऱ्यांचा प्रवेग, सौर वातावरण, तेथील तापमना, सौरप्रभेतील वस्तुमान
(कोरोनल मास इजेक्शन) आदीचा अभ्यास “आदित्य एल-१” करणार आहे.
सुर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेल्या “एल-१” या बिंदुभोवती परिभ्रमण करुन हे यान सुर्याचा अभ्यास करेल. सुर्याच्या सर्वात वरील आवरणाचा अभ्यास करण्यासाठी या यानात सात विविध उपकरणे बसवण्यासत आलेले आहेत.“एल-१” म्हणजे काय ॽ, समजुन घेतांना..
अंतराळातील मोठे वस्तुमान असलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हीचे गुरुत्वाकर्षण समतोल असते. अशा बिंदुना “लँगरेंज पॉईंट” असे म्हटले जाते. सुर्य आणि पृथ्वीशी संबंधित असे पाच बिंदू खगोल अभ्यासकांना सापडले असुन त्यांना अनुक्रमे “एल-१”, “एल-२”, “एल-३”, “एल-४” “एल-५” अशी नावे देण्यात आली आहे. “आदित्य” हे अंतरयान एल-१ या बिंदुवरुन सुर्याचा अभ्यास करणार आहे.
!! अरुणभारती !!
Leave a Reply