Digital Arrest Scam In Marathi
Digital Arrest Scam In Marathi डिजिटल युगात इंटरनेटचा वाढता वापर आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार झाला आहे. या प्रगतीसोबतच डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून घोटाळे आणि फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. या घोटाळ्यांपैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे डिजिटल अटक घोटाळा (Digital Arrest Scam). यामध्ये सायबर गुन्हेगार विविध तंत्रांचा वापर करून सामान्य लोकांना फसवतात आणि त्यांच्या वैयक्तिक, आर्थिक, किंवा डिजिटल माहितीचा गैरवापर करतात. या घोटाळ्या बाबत देशाचे पंतप्रधान यांनी ही उल्लेख केलेला अपणास दिसून येतो. त्यामुळे हा घोटाळा छोट्या व मर्यादीत स्वरूपाचा नाही याची जाणीव असणे महत्वाचे ठरते. यात आपणास आर्थिक व मानसिक धोके आहेत.

डिजिटल अटक घोटाळा म्हणजे काय?
Digital Arrest Scam In Marathi डिजिटल अटक घोटाळा म्हणजे अशा प्रकारचा सायबर गुन्हा, ज्यामध्ये फसवणूक करणारे व्यक्ती किंवा गट स्वत:ला कायदेशीर यंत्रणांचे अधिकारी, पोलीस, किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवतात. ते लोकांना धमकावून त्यांच्या वैयक्तिक किंवा आर्थिक माहितीचा गैरवापर करतात किंवा थेट पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
डिजिटल अटक घोटाळ्याचे प्रकार
१. फसवे कॉल किंवा ईमेल :-
सायबर गुन्हेगार फोन कॉल, ईमेल, किंवा एसएमएसद्वारे व्यक्तीला संपर्क साधतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची भीती दाखवतात. उदा :- “तुमच्याविरुद्ध वॉरंट आहे” किंवा ” तुमच्या आधार कार्डचा वापर गैरप्रकारासाठी झाला आहे ” असे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न होतो. त्यावर अपण सत्य परिस्थितीची माहीती न घेता घाबरुण त्याच्या जाळ्यात अटकतो.
२. सोशल मीडिया फसवणूक :-
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांना खोट्या माहितीच्या आधारे फसवतात. फसवे खाते बनवून किंवा थेट मेसेजद्वारे त्यांच्यावर अटक होण्याची भीती निर्माण करतात. त्याच बरोबर प्रलोभणे व आमिष दाखऊन जाळ्यात अडकवले जाते, अडकलेल्या व्यक्तीस भीती दाखऊन त्या कडून विविध प्रकारे पैस्यांची मागणी केली जाते.
३. फेक पोलीस किंवा सरकारी अधिकारी :-
सायबर गुन्हेगार स्वत:ला पोलीस किंवा इतर कायदेशीर संस्था असल्याचे दाखवतात. ते लोकांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. यात व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवले जाते व आपण त्या भीतीने पैसे ट्रार्सफर करतो .
४. फसवे अॅप्स :-
काहीवेळा लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार फसवी मोबाइल अॅप्स तयार करतात. या अॅप्सद्वारे माहिती चोरून पैसे उकळले जातात. विविध प्रकारचे लोन ॲप्स यात मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
डिजिटल अटक घोटाळा कसा घडतो?
१. भय निर्माण करणे :-
गुन्हेगार व्यक्तींना कायदेशीर कारवाईची धमकी देतात. ” तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ” किंवा ” तुमच्या नावावर वॉरंट आहे ” असे सांगून घाबरवले जाते.
२. तांत्रिक साधनांचा वापर :-
कॉलर आयडी स्पूफिंग, फेक ईमेल आयडी, किंवा बनावट वेबसाईट्सद्वारे फसवणूक केली जाते. अधिकृत पोलीस किंवा सरकारी वेबसाइटचा फसवा क्लोन तयार करून लोकांना गोंधळात टाकले जाते.
३. तुरुंगात जाण्याची भीती दाखवणे :-
” तुमच्या अटकेसाठी पोलिस येणार आहेत ” असे सांगून पीडित व्यक्तीकडून पैसे मागितले जातात. काहीवेळा त्यांना डिजिटल पेमेंट करण्यास भाग पाडले जाते.
४. ओळख पटवण्यासाठी माहिती मिळवणे :-
सायबर गुन्हेगार व्यक्तींच्या ओळखीच्या माहितीचा गैरवापर करतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती चोरी केली जाते.
Leave a Reply