१ मे २०२४ पासून शासकीय कामासाठी आईचे नाव लावणे बंधकारक.

Mothers Name in Government Documents Mandatory

       आईचे नाव लावण्याची पंपरा महाराष्ट्रात पूर्वी पासून आहे इ.स.पू. दुसऱ्या  शकतकात आधूनिक महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, आणि मध्यप्रदेशाचा काही भाग या प्रदेशांवर राज्य करणाऱ्या सातवाहन राजवंशातील राजा आपला उल्लेख गौतमीपुत्र सातकर्णी असा करत होता. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील २३ वा सम्राट होऊन गेला तेव्हा पासून ही परंपरा आपल्यास दिसते .

१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्‍तींना लागू

  1. जन्म दाखला
  2. शाळा प्रवेश आवेदनपत्र
  3. सर्व शैक्षणिक कगदपत्रे
  4. जमिनीचा सातबारा , प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्रे
  5. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक
  6. सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा सॅलरी स्लीपमध्ये
  7. शिधावाटप पत्रिका (रेशनकार्ड)
  8. मृत्यू दाखला

 

     विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, जन्म व मृत्यू नोंदी दाखला, सेवापुस्तक, विविध परीक्षांची आवेदन पत्रे इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव वेगळ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात येते. तथापि, महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देण्यासाठी तसेच समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती (अनौरस संतती) यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 

संदर्भ :-

6 responses to “१ मे २०२४ पासून शासकीय कामासाठी आईचे नाव लावणे बंधकारक.”

  1. @prathya_76 Avatar
    @prathya_76

    👍

  2. Harshal Avatar

    Nice information

  3. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice blog akki 👌

  4. […] १ मे २०२४ पासून शासकीय कामासाठी आईचे न… […]

  5. Nawale gayatri Avatar
    Nawale gayatri

    👌

  6. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice information akki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *