न किंचित् शाश्वतम्  | Nothing is Permanent

“न किंचित् शाश्वतम्”  “Nothing is Permanent’’  हे एक संस्कृत वाक्यप्रचार आहे, याचा अर्थ “काहीही कायमस्वरूपी नाही” किंवा “काहीही चिरकाल टिकत  नाही” असा होतो.

            या पृथ्वीतलावर जन्म होतो, हे जेवढे सत्य आहे. तेवढेच सत्य मृत्यू हे पण आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना जोडल्या आहेत. तसेच जेथे विश्वास आहे तेथे विश्वासघात येतो. जेथे प्रेम आहे तेथे तिरस्कारआहेच, जेथे करुणा आहे, तेथे क्रुरता आहेच. या पृथ्वी तलावर निरंतर काही नाही , फक्त शाश्वत अंत आणि मृत्यू हेच  अंतीम सत्य आहे.

            जन्म आणि मृत्यू हि निरंतर चालणारे चक्र आहे. “न किंचित् शाश्वतम्”  “Nothing is Permanent’’ हे वाक्य जेव्हा दु:खात असाल तेव्हा आनंद देते. हेच वाक्य जेव्हा आनंदात असाल तेव्हा दु:ख हे चक्र चालतच राहील हेच सत्य आहे. अंत, मृत्यू हीच या पृथ्वी तलावर “शाश्वत” आहे. हे निरंतर आहे याचा अतं शक्य नाही.

            पृथ्वीतलापासुन मनुष्य जन्मला आल्यापासुन ते मरेपर्यंत सर्व आपल्या ओझ्याच्या माघे धावत असतो. तो हे विसरुन जाते की प्रत्येक गोष्टीचा अंत आहे मग ते प्रेम, विश्वास, नाते, मैत्री, या सर्व गोष्टींचा अंत आहेच. तो एकना एक दिवसी होणारच आहे.

            मनुष्याला या गोष्टीचा विसर पडला आहे, की सर्व गोष्टीचा अंत आहे. स्त्रीला तिच्या सौंर्द्याचा अभिमान असतो व पुरुषाला त्याच्या पुरुषार्थाचा, पण हे सर्व निजतेच गोष्टी आहे. एक काळानंतर या सर्व गोष्टीचा तेज निघुन जाईल. शेवटी तो इतरांशी कसा वागतो त्यावरच त्याचे व्यक्ती महत्व टिकुण राहतांना आपणास दिसुन येते.

            मुनष्यानं समाजात वावरताना आपल्या आजु बाजुला असणाऱ्या व्यक्तींना आपण मोठे व्यक्ती आहेत असे वागुण चालत नाही. आपण सर्वकाही आहोत हे अभिमान बाळगणे चुकीचे आहे, कारण या अभिमानाचा ही अंत नक्कीच आहे. आपल्या बरोबर समोरील व्यक्ती ज्ञानी आहे काॽ अज्ञानी तो गरीब असो वा श्रीमंत या अशा कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगु नयेत. “न किंचित् शाश्वतम्”  “Nothing is Permanent’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *