लोकप्रशासन  परिचय, अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व.

लोक प्रशास म्हणजे काय ते सांगुण लोक प्रशासनाचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा ॽ

राज्य ( देश ) किंवा शासनसंस्था यांच्यामार्फत पार पाडल्या जाणऱ्या प्रशासकीय कार्याला “ लोक-प्रशासन” असे म्हणतात. एकोणाविसव्या  शतकाच्या अत्तरार्धापासून राज्याच्या कार्यक्षेत्रात वाढ होत गेली. कल्याणकारी राज्य संकल्पनेच्या उद्यानंतर तर मानवी जवीनाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी राज्यसंस्थेवर येऊन पडली . आधुनिक काहात लोकांत घडून आलेल्या राजकीय जागृतीमुळे त्यांच्या राज्यसंस्थेकडून असणाऱ्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आपणास दिसुन येत आहेत.

प्रशासनाचा अर्थ            

ग्लॅडन याने असे म्हटले  आहे की, प्रशासन हा भारदस्त व लांबलचक शब्द असाल तरी त्याचा अर्थ गदी सोपा  आहे. इंग्रजीतील Administration या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेमधली  Ad व ministrate या शब्दांपासून झाली आहे. याचा अर्थ लोकांच्या सेवेची व्यवस्था लावणे किंवा काळजी घेणे असा होतो.

लोक प्रशासनाची व्याख्या :-

एल. डी.व्हाईट यांच्या मते एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींचे संचालनए संयोजन व नियंत्रण करणे म्हणजे “प्रशासन” होय.

एफ. ए. निग्रो. यांच्या मते एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटना तसेच व्यक्ती आणि साधने यांचा वापर करणे म्हणजे “प्रशासन” होय

लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये :-

१. लोककल्याणाशी संबंधित  विविध प्रकारच्या सेवा आरोग्य ,  शिक्षण , स्वच्छ  पर्यावरण, सार्वजनीक व्यवसस्था, रस्ते, पाणी, या सारख्या सर्व सोईसुविधा पुरवील्या जातात.  लोकप्रशासनाचे अंतिम उद्दिष्ट जनतेचे कल्याण  करणे हे शासनाच्या विविध योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख कार्य आहे.

२. शासनाचे कार्यकारी अंग :-  विधिमंडळ कायदे करते, न्यायपालिका कायद्याचे संरक्षण व अर्थ लावते, तर प्रशासन कायद्यांची व शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करते. त्यामुळे प्रशासन हे शासनाचे महत्तवाचे कार्यकारी अंग आहे. अंबलबजावणी करत आसतानां मोठ्या प्रमाणाव त्यांना खालच्या स्थरापर्यंत जावे लागते. प्रत्यक्ष लोकांशी त्यांचा संबंध येतो व शासनाच्या विविध प्रकारच्या धोरणाचा त्यांच्यावर भार आलेला आपणास दिसुन येतो.

३.कायद्यावर आधारित :- लोकप्रशासनाचे कार्य संविधान, कायदे, नियम आणि शासनाच्या आदेशांनुसार चालते. प्रशासनाला स्वत:च्या इच्छेनुसार कायम करता येत नाही . मोठ्या प्रमाण सर्व कार्य आदेशावर चालत असते. आपल्या काय वाटते ते महत्वाचे नसुन शासनाने आदेश कोणते पारीत केले आहे त्या वर सर्व चालत असते. सर्व सामान्य त्यांन योग्य अयोग्य असे काही नसते शासन जे काही सांगेल तेच योग्य असे सर्व कायद्यावर अवलंबून असते.

४. लोकाभिमुखता : आधुनिक प्रशासनात नागरिक हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या गरजा, समस्या आणि जबाबदारी ही चांगल्या प्रशासनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. अंबलबजावणी करत असतांना प्रशासनात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष संबंध हा येतो त्यामुळे नागरिक हा केंद्रबिंदू बनलेला आहे.

५.उत्तरदायित्व: लोकशाही व्यवस्थेत‍ प्रशासन जनतेसमोर आणि लोकप्रतिनिधीसमोर उत्तरदायी असते. पारदर्शकता आणी जबाबदारी ही चांगल्या प्रशासनाची महत्वाची वैशिष्ट्ये आहे.लोकशाही व्यवस्थेत उत्तरदायित्व हे चांगल्या प्रशासनाची एक महत्वाचा अंग आहे. जेव्हा एखादी समस्या सोडवता येत नाही किंवा उत्तरदायित्व घेण्याची वेळ येते तेव्हा हे प्रशासन जबाबदार धरले जाते.

लोकप्रशासन म्हणजे काय हे ग्लॅडन यांने सोप्या भाषेत सांगीतले आहे . तेव्हा लोकप्रशासन यांची वैशिष्टे वरिल प्रमाणे सांगता येतील.

!! अरुणभारती !!

संदर्भग्रंथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *