सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर. टी. ई.  ( RTE ) २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

RTE 25% Admission Academic Year : 2024-2025

     दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक ०९.०२. २०२४ मधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत. त्यानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत
     १ ली ते ८ वी पर्यंतच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील सुधारित अधिसूचना दिनांक ९.०२.२०२४ नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत

     शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखादया पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची/शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा / शासकीय शाळा निवडता येईल.
     विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाईल.
    अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होतील.

 !! अरुणभारती !!

4 responses to “सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर. टी. ई.  ( RTE ) २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया”

  1. Tushar Avatar
    Tushar

    Nice information brother 😊👍

  2. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice blog akki🤗

  3. Tushar Avatar
    Tushar

    Nice bro 👍

  4. Yogesh Vinayak Bawa Avatar
    Yogesh Vinayak Bawa

    Nice akki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *