हृदय नसलेला समाज

Hruday Nasalela Samaj

(वकिल दामिनी, आपल्या बहिणीला बघायला एका दवाखान्यात प्रवेश करते.)

दामिनी  :- करुणा,- ऐ करुणा कशी आहेस. बरं वाटते ना हे बघ काळजी करु नकोस, सर्व व्यवस्थित होईल लवकर बरी हो. अगं आपल्याला केस जिंकायची आहे ना………(अचानक ) डॉक्टर,……….. डॉक्टर………. नर्स.

डॉक्टर :-  What Happened, ओ. नर्स लवकर इंजक्शन भरा.Come on fast,स्ट्रेचर आणा आणि यांना I.C.Uमध्ये  Shift करा Hurry Up. करुणा Relaxe  तुला काहिच होणार नाही . हं. दामिनी, तुम्ही बाजुला व्हा. करुणा……. करुणा….. (सर्वत्र शांतता) No, Sorry Miss Damini……..

दामिनी :-   No डॉक्टर……. No. हे असं होवु शकत नाही. नाही….नाही करुणा तु अशी माला एकटी सोडून जावू शकत नाही . अगं ऊठ …ऊठना. बघं तुझी ताई तुला उठवतय .. डोळे उघड गं. उठ अगं अजून तर त्या नराधमाला फासावर चढवायचं आहे. ज्यानं तुझ्यावर हा अत्याचार केला आहे. त्याला अजुन शिक्षा व्हायची बाकी आहे. आणि तु अशी गप्प नाही राहू शकत…ऊठ….उठना.

डॉक्टर :-  Miss, दामिणी शांत व्हा. सांभाळा स्वत:ला तुम्ही वकिल आहात असं वागणे योग्य नाही जे व्हायच होतं ते तर झालचं ना. आपण माण्सं तरी काय करुशकतो सर्व काही  देवाच्या मर्जीवर……….. (मध्येच बोलत दामिनी)

दामिनी :- नाही डॉक्टर नाही सर्व त्या देवाच्या हातात नसतचं जे असतं तर ते माणसाच्या हातात जर देवाच्या हाती राहिल असतं तर त्या रात्री माझ्या बहिणीवर होणारा अत्याचार अस डोळे बंद करुन बघत नहिला नसता. डॉक्टर, करुणा त्या दिवशी एकटी लोकल मध्ये प्रवास करित नव्हीत. तर तेथे तो सुध्दाा बसला होता. जो स्वत:ला बाप म्हणुनवुन घेतो. काय करत होता. आपल्या चष्म्यावरिल धुळ सांफ करत तो बाहेर बघत होता की, आपलं  स्टेशन आले की नाही. कारण त्याला घाई होती ती घरी जाण्याची त्याच्या पत्नी, मुलगी, सुन वाट बघत होती. पण त्याच्याच समोर त्याच्या मुलीपमाणे असणाऱ्या करुणाची अब्रु लुटली जात होती तरी तो ते एका आंधळ्याप्रमाणे दुर्लक्ष करुन बसला होता. बाप म्हणवुन घेतो स्वत:ला.

            त्याच्या बाजुला तो सुध्दा बसला होता. तो डॉक्टर, जो दरवर्षी आपल्या बहिणी कडून रक्षा बंधनाला राखी बांधतो आणि तिची जीवनभर रक्षा करण्याचे वचन घेतो. त्याच्याच समोर माझ्या करुणाच्या लक्तराचे लचके तोडले जात होते. आणि तो अपल्या पुस्तकाची पाने चाळित होता. …..स्त्री समानता, स्त्री मुक्ती………. हे आजचे तरुण आपलं खरं कर्तव्य विसरुन बघुन सुध्दा भावना शुन्य होतात. तेव्हा  हो  तो असाचं बघत राहिला असता का. जेव्हा त्या ठिकाणी त्याची स्वत:ची बहिण राहिली असती…………..(रडु येते)

            तिथं, त्या स्त्रिया सुध्दा होत्या. ज्यांच्या मुली रोज लोकल मधुन प्रवास करतात ज्या स्त्री मुक्ती साठी कार्य करतात. पण एका स्त्रीवर होणारा अन्याय डोळेउघडून शांतपणे बघत होत्या……………स्त्री म्हणवता स्वत:ला अरे शी, लाज वाटते मला त्यांना स्त्री म्हणायची.

            तिथं तो सुध्दा बसला होता तो. जो समाज सुधारण्याची कामे करतो. सतय आपल्या वर्तमान पत्रात लिहितो. पण, एका अबलेवर होणारा अत्याचार तो निमुटपणे पहात होतो. विरोध करु शकला नाही . कसा करेल त्याच्या वर्तमान पत्राला हे चांगले प्रकरण मिळाले नसते.

            त्या डब्यातील ते सर्व लोकं हा तमाशा पहात होते केवळ एका स्तंभासारखे. कुणाच्या हो हृदयाला पाझर फुटला नाही. हा समाज जो स्वत: ला प्रतिष्ठित समजतो. तो मुक, बधिरपणे बघत होता होणारे अत्याचार एका षंडा प्रमाणे. अरे का म्हणुन . जरा सुध्दा विचार केला नाही की . त्या ठिाकणी त्यांची मुलगी, बहिण, आई, सुन सुध्दा असु शकते. नाही पण त्यांना एका शंडाप्रमाणे जगायची सवय झाली आहे. त्या दिवशी त्या तरुणांची रक्त पेटली नाहीत कीए एका नराघमाला रोखु शकले नाही. अरे मगं का म्हणुन  रावणाला जाळता. जाळायचं तर त्या तुमच्या मधिल रामाला जाळा, त्या  नराधमाला जाळा, जो रक्त लागलेल्या वाघाप्रमाणे फिरतोय. पण, मी हे तुम्हाला का सांगतेय. राहा बाबांनो. तुम्हाला जसं रहायचं तरस रहा. जसं जगायचं तसं जगा एखाद्या शंडाप्रमाणे, राहु द्या आम्हा आबलांना एकाकी….पडू द्या  आणखी प्रेतं……पडू द्या…. एका जिवंत …. प्रेताचं….समाज……हा…..समा………………ज……

लेखक- जयवंत सूर्यवंशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *